जळगावकाही सेकंदांपूर्वी
- कॉपी लिंक
शहरातील प्रचंड वर्दळीच्या असलेल्या काव्यरत्नावली चौक ते डी-मार्ट दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण व पादचारी रस्त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापौर जयश्री महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. जळगाव शहरात ३८ कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. काव्यरत्नावली चौकापासून गिरणा टाकी रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे; परंतु काव्यरत्नावली चौकापासून शिरसोली नाकाकडे जाणाऱ्या रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
या रस्त्यावर अमृत जलवाहिनीचे काम करण्यात आले आहे. रस्त्यावर उंचवटे तयार झाले असून वाहनांसाठी अडचणीचा ठरताे आहे. या मार्गावर भाऊंचे उद्यान, आरटीओ कार्यालय तसेच राष्ट्रीयीकृत बँकांचे कार्यालय देखील आहेत. शहरातील प्रवेशासाठी या रस्त्याचा वापर प्रामुख्याने केला जाताे. त्यामुळे महापौर महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मागणीचे निवेदन दिले आहे.