सांगलीचा जवान लडाखमध्ये शहीद: नायब सुभेदार जयसिंग शंकर यांचा हिमस्खलनात मृत्यू, आज खानापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


कोल्हापूरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सांगली जिल्ह्यातील खानापूर गावचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग शंकर भगत हे लेह लडाखमध्ये शहीद झाले आहेत. लडाखमध्ये झालेल्या हिमस्खलनात जयसिंग शंकर भगत यांचा मृत्यू झाला आहे. आज खानापूर या मूळ गावी जयसिंग भगत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

Advertisement

नायब सुभेदार जयसिंग शंकर भगत यांचे पार्थिव लष्कराच्या विशेष विमानाने लडाख मधून पुण्यात येणार आहे. त्यानंतर पुण्यातून खानापूर या त्यांच्या मूळ गावी आणले जाईल आणि अकरा वाजता त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इत्तमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

40 वर्षीय जयसिंग भगत हे 22 मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये सुभेदार म्हणून कार्यरत होते. या घटनेनंतर खानापूर तालुक्यासह सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. खानापूर ते गोरेवाडी मार्गावरील भगतमळा परिसरातील मातोश्री मंगल कार्यालयसमोरील पटांगणावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement