सहसंघचारी खेळाडू सुदर्शनवर तेवतीयाने आपला राग ओकला, संतापाचे कारण समोर आले…

आजच्या सामन्यात धोनीचे गुडलक लकी ठरणार का विराट कोहलीचा फॉर्म पुढे सुरु राहणार, नेमके काय होणार...
आजच्या सामन्यात धोनीचे गुडलक लकी ठरणार का विराट कोहलीचा फॉर्म पुढे सुरु राहणार, नेमके काय होणार...

आयपीएल २०२२ हंगामात मंगळवारी ४८ वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने ८ विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात गुजरात टायटन्सची फलंदाजी फारशी चांगली झाली नाही, याचवेळी अष्टपैलू राहुल तेवतिया फलंदाजीदरम्यान युवा खेळाडू साई सुदर्शनवर भडकलेला दिसला.

नक्की काय झाले?

Advertisement

या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, गुजरातने ४ विकेट्स केवळ ६७ धावांवर गमावल्या होत्या. त्यामुळे गुजरातला एका चांगल्या भागीदारीची गरज होती. यावेळी साई सुदर्शन आणि राहुल तेवतिया यांनी गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ४५ धावांची भागीदारीही केली.

मात्र, त्यांच्या भागीदारीच्या सुरुवातीलाच तेवतिया साई सुदर्शनवर भडकला होता. झाले असे की, १२ व्या षटकात मिलर बाद झाल्यानंतर तेवतिया फलंजादाजीला आला. लियाम लिव्हिंगस्टोनने टाकलेल्या या षटकातील अखेरच्या चेंडूवर तेवतियाला चपळाईने एकेरी धाव काढायची होती. त्याने कव्हर-पॉइंटच्या दिशेला चेंडू मारला होता. पण यावेळी साई सुदर्शनने एकेरी धाव काढण्यास नकार दिला, त्यामुळे तेवतियाला क्रिजमध्ये परत जावे लागले. त्यामुळे तेवतिया साई सुदर्शनवर चिडलेला दिसला.

Advertisement

पण, यानंतर तेवतियाने त्याच्याबरोबर चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, १७ व्या षटकात तेवतियाला कागिसो रबाडाने ११ धावांवर बाद केले. पण साई सुदर्शनने शानदार फलंदाजी करताना अर्धशतक पूर्ण केले. त्याने ५० चेंडूत नाबाद ६५ धावा केल्या. त्यामुळे गुजरातला २० षटकात ८ बाद १४३ धावा करता आल्या. पंजाबकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

पंजाबने जिंकला सामना

Advertisement

पंजाबने गुजरातने दिलेले १४४ धावांचे आव्हान १६ षटकातच पूर्ण केले. पंजाबकडून शिखर धवनने अर्धशतक करत नाबाद ६२ धावा केल्या. तसेच भानुका राजपक्षेने आक्रमक खेळत ४० धावा केल्या. त्याचबरोबर लिव्हिंगस्टोनने १० चेंडूत नाबाद ३० धावांची खेळी केली. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि लॉकी फर्ग्यूसनने प्रत्येकी १ विकेट घेतली.

Advertisement