सहकार पॅनलचा प्रचार सुरू: नाशिकरोड व्यापारी बँकेसाठी 104 अर्ज दाखल; पॅनलचा तिढा कायम, विद्यमान संचालकही पेचात


नाशिक4 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्या निवडणुकीसाठी २१ जागांसाठी ११ जुन रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी आजपर्यंत एकुण ३०८ अर्जाची विक्री झाली आहे. तर सोमवारी १०० अर्ज दाखल होते, तर एकुण १०४ अर्ज दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

सत्ताधारी सहकार पँनलच्या वतीने प्रचाराला सुरुवात केली असून सोमवारी जेलरोड परिसरातील व्यापाऱ्यांसाठी एका हाँटेलमध्ये दत्ता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मिसळपार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सहकार पँनलकडून बँकेची प्रगतीचा अध्याय सांगितला जाणार आहे, तर विरोधी परिवर्तन पॅनलकडुन बँकेच्या कारभारावर बोट ठेवले जाणार आहे. दोन्ही पँनलची निर्मिती झाली नसल्याने विद्यमान संचालकांसह इच्छुकांमध्ये अद्यापही धाकधूक सुरू आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागात एकुण ७२ हजार ५०० मतदार संख्या असलेल्या नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक तयार झाले असुन त्यांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. अर्ज दाखल करण्याची मंगळवारी (दि.१६) ही अंतिम मुदत असल्याने बहुतांश इच्छुकांनी सोमवारी अर्ज केले, तर काहींनी मुहूर्तावर अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार निवडला आहे.

Advertisement

निवडणुकीचे वातावरण तापत असून पॅनल निर्मितीनंतर खऱ्या अर्थाने प्रचाराची रंगतदार सुरुवात होणार आहे.अनेकांनी तर महापालिका निवडणुक डोळ्यासमोर व्यापारी बँकेची निवडणूक ही मतदारापर्यंत पोहचण्याचे माध्यम म्हणून पाहात आहे.त्यामुळे यंदा निवडणुकीला वेगळेच स्वरुप लागणार असल्याचे चित्र आहे.

सहकार व परिवर्तन असे दोन पँनलमध्ये लढत रहाणार आहे. सोमवारी एका हाँटेलमध्ये सहकार पँनलच्या वतीने व्यापाऱ्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती, यावेळी दत्ता गायकवाड, प्रकाश घुगे, डाँ. प्रशांत भुतडा, अशोक चोरडिया, अनमोलक भंडारी, कुलदिप आढाव, गणेश सातभाई, संतोष पिल्ले, सागर भोजणे हे उपस्थित होते.

Advertisement



Source link

Advertisement