पुणे5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच समस्या जाणून घेतल्या. रुग्णालयाला आवश्यक मनुष्यबळाच्या पूर्ततेसाठी गतीने कार्यवाही करावी अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. यावेळी आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजीराव जाधव, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याच्या कार्यवाहीला गती द्यावी भूलतज्ज्ञ व अन्य पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू असेपर्यंत बाह्यस्रोताद्वारे मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे, असे मंत्री वळसे पाटील म्हणाले. कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णांच्या संख्येत सुमारे दीडपट वाढ झाली आहे. त्यामुळे औषधांची गरज वाढली असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जाधव यांनी सांगितले. औषध पुरवठ्याच्या अनुषंगाने शासनस्तरावरून कार्यवाही सुरू असून औषध पुरवठाबाबत अडचण येऊ दिली जाणार नाही, असे मंत्री वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा, वैद्यकीय उपकरणे आदी अनुषंगाने आढावा घेऊन सूचना दिल्या.
योग निद्रा शिबीर पुण्यात संपन्न
योगनिद्रा ही एक ध्यान साधना असून याचा प्रचार प्रसार करण्यासाठी कोथरूड येथील ऋषी चैतन्य योगा अँड मेडिटेशन सेंटरच्या वतीने योग निद्रा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आगरकर रोडवरील दादासाहेब दरोडे हॉल येथे योगनिद्रा विशेष सत्र पार पडले. यावेळी १७० हून अधिक नागरिकांनी योगनिद्रा शिबिरात सहभाग घेतला होता. आनंदमूर्ति गुरुमाँ भक्तपरिवारातर्फे भारतातील ४० शहरामध्ये एकाचवेळी योग निद्रा शिबीर पार पडले. हजारो लोकांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला होता.आजच्या स्पर्धेच्या युगात ताण-तणावग्रस्त होणे स्वाभाविक आहे. याचे दुष्परिणाम शरीरावर होतात. त्यामुळे योग निद्रा हा तणाव, निद्रानाश, नैराश्य तसेच मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांवर प्रभावी उपचार आहे. योग निद्रा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी प्रमाणित केले आहे. योग निद्रा औषधांशिवाय उच्च रक्तदाब आणि मानसिक आजार बरे करण्यास मदत करते