सलग तीन विजय मिळवत हैदराबादचा सन (राईज) झाला; राहुल त्रिपाठी-मार्करम यांची वादळी खेळी

सलग तीन विजय मिळवत हैदराबादचा सन (राईज) झाला; राहुल त्रिपाठी-मार्करम यांची वादळी खेळी
सलग तीन विजय मिळवत हैदराबादचा सन (राईज) झाला; राहुल त्रिपाठी-मार्करम यांची वादळी खेळी

राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर हैदराबादने कोलकात्याचा सात गड्यांनी पराभव केला आहे. यासह हैदराबादने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. कोलकात्यानं दिलेलं १७६ धावांचं आव्हानं हैदराबादने सात विकेट आणि १३ चेंडू राखून पार केले. कोलकात्याच्या एकाही गोलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी गोलंदाजी करता आली नाही.

राहुल त्रिपाठी आणि मार्करमच्या वादळापुढे कोलकात्याची गोलंदाजी दुबळी दिसत होती. ब्रेब्रॉन स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना खेळवण्यात आला. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाताच्या डावाची सुरुवात खराब झाली. अजिंक्य रहाणेच्या जागी खेळणारा फिंच स्वस्तात आटोपला. त्याच्याशिवाय अन्य आघाडीच्या फलंदाजांकडून फ्लॉप शो पाहायला मिळाला. त्यानंतर मध्यफळीतील फलंदाज नितीश राणाने केलेले अर्धशतक ५४ (३६) आणि आंद्रे रसलने ४९ (२५) अखेरच्या षटकात दाखवलेली मसल पॉवर याच्या जोरावर कोलकाताने निर्धारित २० षटकात ८ बाद १७५ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवातही काशीची तशीच झाली. पण पहिल्या दोन विकेट पडल्यानंतर राहुल त्रिपाठीनं संघाचा डाव सावरला. त्याने अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाच्या दिशेनं नेलं. ३७ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने त्याने ७१ धावांची दिमाखदार खेळी केली. तो बाद झाल्यानंतर मार्करमनं ३६ चेंडूत नाबाद ६८ धावांची खेळी करत सिक्सर मारून संघाला विजय मिळवून दिला. ३७ चेंडूत ७१ धावांची वाढली खेळी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

सुनिल नरिनच्या रुपात यावेळी केकेआरला तिसरा धक्का बसला. नरिनला ६ धावा करता आल्या. त्यामुळे ८ षटकांमध्ये केकेआरची ३ बाद ५७ अशी स्थिती होती. आरोन फिंचनंतर केकेआरचा दुसरा सलामीवीर वेंकटेश अय्यरही झयपट बाद झाला. अय्यरला यावेळी ६ धावा करता आल्या. आरोन फिंच आज पहिल्यांदाच केकेआरसाठई मैदानात उतरला होता. पण पहिल्याच सामन्यात फिंचला छाप पाडता आली नाही. फिंचला यावेळी फक्त सात धावाच करता आल्या.

आंद्रे रसेलने यावेळी फलंदाजी करताना २५ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार आणि ४ षटकार ठोकत ४९ धावा झळकावल्या. यावेळी तो  शेवटच्या षटकापर्यंत नाबाद राहिलेला. या धावा करताना त्याने मारलेल्या ४ षटकारांमुळे तो आयपीएलमध्ये अखेरच्या षटकांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. आयपीएलमध्ये अखेरच्या षटकांमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे. त्याने आयपीएमध्ये अखेरच्या षटकात फलंदाजी करताना १६७ षटकार ठोकले आहेत.धोनीनंतर कायरन पोलार्ड दुसऱ्या स्थानी आहे. त्याने १४१ षटकार ठोकले आहेत. त्यानंतर तिसऱ्या स्थानी १४० षटकारांसह एबी डिविलियर्स आहे. तसेच, चौथ्या स्थानी रोहित शर्मा असून त्याने ९० षटकार मारले आहेत. या सर्वांनंतर रसेलचा नंबर लागतो. रसेलने आतापर्यंत एकूण ८९ षटकार मारले आहेत.

हैदराबादचा भेदक मारा –
हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. कोलकात्याच्या फलंदाजांना मैदानावर टिकू दिले नाही. ठरावीक अंतराने कोलकात्याच्या विकेट घेतल्या. हैदराबादकडून नटराजन याने सर्वाधिक भेदक मारा केला. नटराजन याने चार षटकार तीन विकेट घेतल्या. तर युवा उमरान मलिक यानेदोन विकेट घेतल्या. त्याशिवाय भुवनेश्वर कुमार, मार्को जानसेन आणि जगदिश सुचित यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.