अहमदनगर29 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी मंगळवार 14 मार्चपासून बेमुदत संप सुरू केला आहे. बुधवारी 15 मार्चला देखील हा संप सुरूच होता. संपामुळे राज्य सरकारी कर्मचारी कामावर उपस्थित नसल्याने विविध सरकारी कार्यालयांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. दरम्यान बुधवारी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने देखील केली.
जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करा, सर्व रिक्त पदे भरा, निवृत्तीचे वय 60 वर्षे करा, नवीन शिक्षण धोरण रद्द करा, केंद्र प्रमाणे वाहतूक शैक्षणिक व इतर भत्ते द्यावेत, शिक्षणसेवक, ग्रामसेवकांना देण्यात येणाऱ्या मानधनात महागाईचा विचार करून वाढ द्यावी, शासकीय विभागात खाजगीकरण कंत्राटीकरण करू नये,या मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने हा बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे.
बुधवारी सरकारी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाकण्यात आलेल्या पेंडालमध्ये बसले होते.राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, उपाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे यांच्या नेतृत्वाखाली हा संप सुरू आहे.
सलग दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद यासह अनेक शासकीय कार्यालयातील कामकाज कर्मचाऱ्यां अभावी ठप्प झाले होते.
संपाच्या दुसऱ्या दिवशी महसूल कर्मचारी
संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेन्शनच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली. अहमदनगर तहसील व नेवासे अहमदनगर प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचारी देखील या आंदोलनात सहभागी झाले होते.
जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहील असे सरकारी मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे यांनी सांगितले.
बुधवारी झालेल्या आंदोलनात कर्मचारी संघटनेचे महेश म्हस्के, आत्माराम गाडेकर,ओम खुपसे,दीपक पांढरे,एम. डोळस, सूर्यभान ओहोळ, प्रशांत आवारे, दिगंबर करपे, नामदेव गाडे,संतोष तनपुरे, सचिन लाळगे, व्ही.पी. कसोरीया, पी .बी .भोगे, प्रतीक्षा पाटेकर सोनल खेडकर, दत्तात्रय मिसाळ,सरिता मुंडे, कविता वाकडे दिलीप जायभाय, गणेश आगळे संदीप तांबे, सारिका वांडेकर, विकास साळवे, पुनम गावडे , सुवर्णा वैद्य, शारदा दारकुंडे, राजेंद्र लाड, व्ही.बी.बेरड, फंड आदी सहभागी झाली होती.