समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच: नागपूरहून औरंगाबादला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, 1 ठार 20 जखमी


नागपुर2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या राही ट्रॅव्हल्स या खासगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजाजवळील असोला फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 20 प्रवासी जखमी झाले आहेत.

Advertisement

हजारो कोटींचा खर्च करुन उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. वन्य प्राण्यांमुळे, टायर फुटल्याने याठिकाणी आत्तापर्यंत अपघात झाले आहेत. आज पहाटे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात झाला आहे. जखमींना जालन्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले. तेव्हापासून ते 19 जानेवारी आजपर्यंत 40 ते 45 दिवसात जवळपास 20 अपघात झाले आहेत.

Advertisement

आज पहाटे झालेल्या अपघाताग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर निघून महामार्गाच्या बाजूला जात असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले. यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, एक प्रवासी गंभीर जखमी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातग्रस्त बस महामार्गाच्या बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

संबंधित वृत्त

Advertisement

वेगाचा माेह आवरा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपूर ते शिर्डीदरम्यानच्या पहिल्या टप्प्यात ५० हजारांहून अधिक वाहनांनी या महामार्गावरून प्रवास केला. ११ ते १९ डिसेंबरच्या काळात ५१ अपघात झाले. यातील २७ अपघात केवळ वन्य प्राण्यांचे झाले, तर चालकाला डुलकी लागल्याने सहा अपघात झाल्याचे समोर आले. वाचा सविस्तर

Advertisement

समृद्धी महामार्गावर कार‎ उलटल्याने सहा जण जखमी‎

भरधाव कार उलटल्याने सहा जण जखमी झाल्याची‎ घटना बदनापूर तालुक्यातील बाजार गेवराई हद्दीत‎ समृद्धी महामार्गावर बुधवारी रात्री दीड वाजेच्या‎ सुमारास घडली. दोघे गंभीर जखमी आहेत.‎ त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात‎ उपचार सुरू आहे.‎ वाचा सविस्तर

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement