समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे काम बंद: जि. प.समोर लक्षवेधी धरणे, सेवेत कायम करण्यासह वेतनवाढ, बढती हवी, पीएफ, विमाही नाही


अमरावती29 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेसमोरील लक्षवेधी धरणे आंदोलनात सहभागी झालेले समुदाय आरोग्य अधिकारी. 

जिल्ह्यातील पाऊणे तीनशे समुदाय विकास अधिकाऱ्यांनी (सीएचओ) आज, सोमवारी जिल्हा परिषदेसमोर लक्षवेधी धरणे आंदोलन केले. या आंदोलनामुळे सर्वांनी दिवसभर काम बंद ठेवले होते. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास आगामी 23 जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

सेवेत कायम करण्यासह ब वर्ग अधिकाऱ्यांचा दर्जा, 40 हजार रुपयांपर्यंत वेतनवाढ, जिल्हाबाह्य व जिल्ह्यांतर्गत बदली, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार बढती, शासनाने घोषित केल्यानुसार ‘हार्ड एरिया अलाउंस’ची अंमलबजावणी, भविष्य निर्वाह निधी व विम्याचे कवच, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 23 ऐवजी 18 इंडिकेटर लागू करणे किंवा वाढीव प्रत्येक इंडिकेटरसाठी दरमहा एक हजार रुपये अतिरिक्त रक्कम, मूळ वेतनाच्या दहा टक्के कामावर आधारित मोबदला आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

Advertisement

संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अंकुश मानकर व सचिव विकास नेहटकर यांच्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक उपकेंद्रावर प्रत्येकी एक सीएचओ कार्यरत आहे. उपकेंद्रांची संख्या तिनशेहून अधिक असली तरी शासनाने 273 सीएचओंचीच नियुक्ती केली आहे. नियमानुसार सहा वर्षाच्या सेवेनुसार आम्हाला नोकरीत कायम करुन त्यानुसार वेतन द्यायला पाहिजे. परंतु वारंवार हा मुद्दा रेटल्यानंतर कायमीकरण तर सोडा परंतु इतर मागण्याही मंजूर झाल्या नाहीत. त्यामुळेच आज राज्यभरातील जिल्हा परिषदांसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

यानंतरही शासन जुमानले नाही तर आम्ही आमच्या न्याय मागण्यांसाठी 23 जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहोत. आजच्या आंदोलनात उपाध्यक्ष शुभम वानखडे व डॉ. सोनाली देशमुख, कोषाध्यक्ष संदीप दुबे, सहसचिव डॉ. शुभम झाडोकार, सहकोषाध्यक्ष डॉ. श्वेता सांबे, महिला सेलच्या अध्यक्ष डॉ. शिल्पा बोरकर, इतर पदाधिकारी डॉ. साकीब अहमद, डॉ. देविदास बनसोड, डॉ. सुरेश सोळंके, डॉ. समाधान तायडे, संकेत चव्हाण, डॉ. निखील देशमुख, डॉ. चैतन्य बुरखंडे यांच्यासह जिल्हाभरातील सीएचओ सहभागी झाले होते.

Advertisement

23 पासून बेमुदत आंदोलन

समुदाय विकास अधिकाऱ्यांनी आजच्या लक्षवेधी आंदोलनाद्वारे शासनाला इशारा दिला आहे. दरम्यानच्या काळात शासनाने योग्य पाऊल न उचलल्यास आगामी 23 जानेवारीपासून राज्यभरातील सीएचओ बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. आजच्या आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये तसा उल्लेखही करण्यात आला आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement