नाशिक16 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
श्री स्वामी समर्थ सेवामार्ग, समर्थ गुरुपीठ आणि श्री स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित जागतिक कृषी महोत्सवच्या मंडप उभारणी व इतर कामांचा शुभारंभ गुरु माऊली प. पू. अण्णासाहेब मोरे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
25 ते 29 जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या या शेतकरी हिताच्या भव्य कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आज भूमिपूजन सोहळ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सेवामार्गाचे कृषी अभियान प्रमुख आबासाहेब मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी संवाद साधला.
ते म्हणाले, ” लाखो शेतकरी, सेवेकरी, भाविक, विद्यार्थी, कृषी अभ्यासक, संशोधक, व्यापारी, संस्था, लहान मोठे उद्योजक हे वर्षभर या महोत्सवाची वाट पाहत असतात परंतू गेली तीन वर्ष करोना महामारीमुळे नाशिकमध्ये होणारा हा महोत्सव होऊ शकला नाही. पर्याय म्हणून करोना नियम पाळत शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले.
तीन वर्षांनी होत असलेल्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असं की गेल्या दोन महिन्यात जळगाव, अमरावती आणि बीड येथे सेवामार्गाच्या वतीने विभागीय कृषी मेळावे संपन्न झाले. या मेळाव्यांच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना नवी उमेद मिळाली.या सर्व वातावरणनिर्मिती मुळे नाशिक महानगरात होणाऱ्या या जागतिक कृषी महोत्सवात पाच दिवसात 10 लाखाहून अधिक व्यक्ती हजेरी लावतील असा विश्वास आबासाहेब मोरे यांनी व्यक्त केला.
या वर्षी महोत्सवात खाभरडधान्य. भरडधान्यास आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्व आहेच पण जनावरांचा चारा, पर्यावरण, शेतकऱ्यांची उपजीविका या दृष्टीने सुद्धा णण्यासाधारण महत्व आहे. याबाबतीत लागवड ते बाजारप यासह भारतीय शेती, दुर्मिळ वनोषधी, अत्याधुनिक शेती ज्ञान, तंत्रज्ञान, स्वयंरोजगार, शेतकरी वधुवर परिचय, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषी पर्यटन, आरोग्य व व्यसनमुक्ती, गावरान बी बियाणं, प्राचीन भारतीय कृषी विज्ञान, बारा बलुतेदार गाव, कृषी प्रबोधन सांस्कृतिक कार्यक्रम, कृषी व खाद्य संस्कृती असे विविध विषयांवर मार्गदर्शन, प्रबोधन करणारे विभाग येथे असतील.
25 जानेवारी रोजी कृषी दिंडीने महोत्सव सुरू होईल. रामकुंड ते डोंगरे वसतिगृह मैदान अशी निघणारी कृषी दिंडी हे या कार्यक्रमात खास आकर्षण असते. याच दिवशी दुपारी विषमुक्त शेती, भरडधान्य यावर चर्चासत्र होईल. 26 जानेवारी रोजी युवा महोत्सव आणि पशुगोवंश चर्चा, 27 रोजी स्वयंरोजगार व शेतकरी वधुवर मेळावा, 28 रोजी माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण, दुर्ग संवर्धन परिषद, 29 जानेवारी रोजी आरोग्य महामेळा तसेच सरपंच, ग्रामसेवक मांदियाळीने महोत्सवाची सांगता होईल.