समरजितसिंह घाटगे यांनी फेटाळले आरोप: म्हणाले – हसन मुश्रीफ स्टंटबाजी करत आहे, माझा छापेमारी प्रकरणाशी संबंध नाहीएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर 3 दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापे टाकले होते. यापाठीमागे कागलचे भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला होता. या आरोपांवर समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. किरीट सोमय्या यांच्या आडून मला काहीही करण्याची गरज नाही. माझ्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीसह आयकर विभागानेही छापे टाकले होते. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयासह 100 कोटींचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्यांनी केला होता.

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण

Advertisement

या छापेमारीबाबत हसन मुश्रीफ यांनी कागलमधील त्यांचे कट्टर राजकीय वैरी समरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता त्यांच्यावर संशय व्यक्त करत टीका केली होती. 4 दिवसांपूर्वीच कागलमधील एक भाजप नेते दिल्लीत चकरा मारत होते. माझ्यावर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती. विरोधी पक्षातील नेत्यांना नाऊमेद करण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण केले जात आहे. अशा कारवायांचा सर्वत्र निषेध झाला पाहीजे. असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते.

तसे करण्याची गरज नाही

Advertisement

याबाबत आज समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. ते म्हणाले, हसन मुश्रीफ यांच्या घरावर पडलेल्या छापेमारीत माझा संबंध नाही. मी या प्रकरणात कोणत्याही प्रकारे संबंधित नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आड लपून मला काहीही करण्याची गरज नाही. मी किरीट सोमय्या यांना कागदपत्रे पुरवल्याचा आरोप होत आहे. परंतु तसे करण्याची मला गरज नाही.

मुश्रीफांची स्टंटबाजी

Advertisement

पुढे बोलताना समरजितसिंह घाटगे म्हणाले, हसन मुश्रीफ यांच्या घरावर कारवाई झाली त्यावेळी मी दिल्लीला गेलो होतो याचा अर्थ असा नाही की मी ईडीच्याच कार्यालयात गेलो होतो. हे सर्व आरोप बालिश स्वरुपाचे आहेत. चौकशीला सामोरे जाण्याऐवजी मुश्रीफ स्टंटबाजी करत आहेत. असा टोला समरजितसिंह घाटगे यांनी यावेळी लगावला.

पुढे समरजितसिंह घाटगे म्हणाले, ज्या नवाब मलिकांवर दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय त्यांच्याविषयी हसन मुश्रीफ यांना इतके प्रेम का आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement