नाशिक4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सत्ता गेल्यानंतर तळापर्यंत जावून सभासद नाेंदणी करण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार काय कारवाई केली याचा तालुकानिहाय आढावा घेतल्यानंतर त्यात येवला तालुक्यात जवळपास अडीच ते तीन हजार पुस्तकांची सभासद नाेंदणी झाली तर अन्य तालुक्यात हेच प्रमाण तीनशे ते चारशे पुस्तकांपर्यंत मर्यादीत असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदारांसह ग्रामीण पदाधिकाऱ्यांची चांगलीच झाडझडती घेतली. दरम्यान, येवला हा माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असल्यामुळे ते पास व ग्रामीण राष्ट्रवादी नापास असे चित्र निर्माण झाले असून आता सभासद नाेंदणीचा पाऊस एकट्या येवल्यात कसा पाऊस पडला याचा शाेध आमदार घेत आहेत.
नाशिक दाैऱ्यावर असलेल्या पाटील यांनी पक्षाच्या क्रियाशील सभासद नोंदणीचा आढावा घेतला. प्रत्येक तालुकाध्यक्षांना सभागृहात उभे करत किती सभासद नोंदणी झाली, किती पुस्तके मिळाली, बुथ कमिटया गठीत आहे का अशी हजेरी घेणे सुरू केले. तालुकाध्यक्षांबराेबर महिला, युवा, विद्यार्थी विंगच्या कारभाऱ्यांनाही उभे करून प्रश्न विचारले गेले.
या सर्व आढाव्यात भुजबळांचा येवला मतदारसंघ सभासद नाेंदणीत पुढे आल्याचे आढळले. त्यामुळे येथील सभासद नाेंदणीसाठी काेणत्या पदाधिकाऱ्यांने अधिक माया दाखवली असा प्रश्न चर्चचा विषय ठरला. दरम्यान, नांदगावमध्ये सभासद नोंदणी करतांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. सिन्नर तालुक्यातील गटबाजी उघड झाल्यामुळे तालुकाध्यक्षांना वैयक्तीक भेट घेऊन अडचणी मांडण्याची अनुमती दिली.
बैठकीस आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, माजी खासदार समीर भुजबळ, देविदाय पिंगळे, श्रीराम शेटे, दिलीप खैरे, अंबादस बनकर, संजय चव्हाण, दिपीका चव्हाण, जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, विष्णुपंत म्हैसधुणे, प्रेरणा बलकवडे आदी उपस्थित होते.
चांदवडने मागितली विधानसभेची उमेदवारी
चांदवड-देवळा हे दाेन तालुकेमिळून विधानसभा मतदारसंघ असून यंदा चांदवडने चांगली सभासद नाेंदणी केल्यामुळे उमेदवारी तालुक्यातून द्यावी, देवळ्याचा विचार करू नये अशी मागणी झाली. दरम्यान, सत्तेत असताना पक्षातंर्गत कार्यकर्त्यांना नियुक्त्या दिल्या नाही. सभासद नोंदणी करून काय करायचे असा प्रश्न आम्हाला पदाधिकाºयांकडून होत असल्याचे तालुकाध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे साहेब पक्ष कसा वाढवायचा असा प्रश्न तालुकाध्यक्षांनी केल्यानंतर पाटील अंचिबत झाले.
सभासद नाेंदणी करणाऱ्यांना संधी
बैठकीत, प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी चांगली सभासद नोंदणी केल्यास यंदा तालुकाध्यांसह जिल्हाध्यक्ष हे संघटनेतून निवडणुकीच्यामाध्यमातून निवडले जातील असे स्पष्ट केले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आहे.