जळगाव35 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
भुसावळ शासनाने लाखो रूपयांचा खर्च करून उभारणी केलेल्या ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये सफाई कर्मचारी नाहीत. यामुळे दाेन्ही इमारतींमध्ये अस्वच्छतेने रुग्ण त्रासले आहेत. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर आमदार संजय सावकारे यांनी गेल्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर हा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर आरोग्य संचालकांकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांची मागणी नोंदवण्यात आली. पण, हा प्रश्न सुटलेला नाही. जळगाव महामार्गावर साडेसहा एकर जागेत ३ काेटी ८४ लाखांचा निधी खर्च करुन ३० खाटांचे ट्रामा केअर सेंटर व २० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले. या इमारतीत स्वच्छतेसाठी कंत्राट दिले होते. पण, कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. कंत्राट संपल्यावर नवीन प्रक्रिया नाही. त्यामुळे दोन्ही इमारतींमध्ये अस्वच्छता वाढली आहे.
प्रश्न लवकरच सुटेल ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअरच्या स्वच्छतेचा प्रश्न सुटेल. त्यासाठीचा प्रस्ताव नाशिक येथे मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. या पुढे असा प्रश्न निर्माण होऊ नये असे प्रयत्न करू. – संजय सावकारे, आमदार, भुसावळ प्रश्न लवकरच सुटेल ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअरच्या स्वच्छतेचा प्रश्न सुटेल. त्यासाठीचा प्रस्ताव नाशिक येथे मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. या पुढे असा प्रश्न निर्माण होऊ नये असे प्रयत्न करू. – संजय सावकारे, आमदार, भुसावळ