सन्मान ‎: प्रगतीच्या वाटा शाेधणाऱ्यांचे कार्य प्रेरणादायी‎


जळगाव18 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय तेरापंथ महिला‎ मंडळाच्या निर्देशानुसार जळगाव‎ येथील शाखेतर्फे कर्तबगार‎ महिलांचा सन्मान आणित‎ ‘तालमेल’ हा विशेष कार्यक्रम‎ घेण्यात आला. प्रगतीच्या वाटा‎ स्वत: जिद्दीने शाेधणाऱ्या महिलांचे‎ कार्य इतरांनाही प्रेरणा देते. किंबहुना,‎ रस्ता दाखवण्यासाठी ते महत्त्वाचे‎ ठरते, असा सूर या कार्यक्रमात‎ मान्यवर वक्त्यांनी साधलेल्या‎ संवादातून व्यक्त झाला.‎ कार्यक्रमाच्या सुरुवातीला विनीता‎ समदडीया व सदस्यांनी प्रेरणागीत‎ सादर केले. अध्यक्षा नम्रता सेठिया‎ यांनी विचार व्यक्त केले.

Advertisement

‘तालमेल’‎ कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात‎ आत्मनिर्भर असलेल्या २५‎ महिलांचा ‘तालमेल’ नाव‎ लिहिलेला दुपट्टा देऊन सन्मानित‎ करण्यात आले. डाॅ. प्रिती भुरट,‎ सीए सुमन सेठिया, इंटेरीयर‎ डिझायनर स्वीटी बोथरा, साडी‎ विक्रेत्या मीनाक्षी बैद, सीए श्वेता‎ चौरडीया, वर्षा चौरडीया यांनी‎ मनाेगत व्यक्त केले. प्रमुख वक्ता‎ स्नेहा गादियाका यांचा बांबू ट्री देऊन‎ गाैरव करण्यात आला. अर्थात, या‎ सन्मानातून पर्यावरण संवर्धनाला‎ लाेकचवळीचे स्वरुप येणे अपेक्षित‎ आहे असा संदेश देण्यात आला.‎ सहाय्यक पाेलिस निरीक्षक सुनंदा‎ पुंडीक पाटील यांचा विशेष गाैरव‎ करण्यात आला. त्यांच्या कार्याचा‎ परिचय अमिता सेठिया यांनी दिला.‎ सन्मानपत्राचे वाचन सचिव सरिता‎ धाडेवा यांनी केले. कार्यक्रमासाठी‎ ज्योती बोथरा यांचे सहकार्य लाभले.‎ आभार उपाध्यक्षा रीटा बैद यांनी‎ मानले. सूत्रसंचालन उपाध्यक्षा‎ स्नेहलता सेठिया, कार्यकारिणी‎ सदस्या अमिता सेठिया यांनी केले.‎

वेळेचे महत्व आेळखून कुटुंबाची काळजी घ्या : गादिया
‎महिलांनी आत्मनिर्भर हाेणे वर्तमानाची गरज आहे. वेळेचे महत्व आेळखून‎ कुटुंबाची काळजी घेताना स्वत:च्या आराेग्याकडे दुर्लक्ष हाेऊ देऊ नका.‎ सकारात्मक विचाराने पाऊल टाका म्हणजे यशाेशिखर नक्कीच गाठता‎ येईल. निर्णयक्षमता विकसित करण्यासाठी स्वत:च पुढाकार घ्या. एखादा‎ निर्णय घेताना चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्या चुका सुधारून‎ माेठे यश भविष्यात मिळू शकते. विज्ञान, तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन प्रत्येक‎ महिलेने उद्यमी बनावे, असा सल्ला स्नेहा गादिया यांनी दिला.‎

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement