सना खान हत्या प्रकरण: सापडलेला मृतदेह हा सना खान यांचा नसल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट; महिना होऊनही मृतदेहाचा पत्ता नाही

सना खान हत्या प्रकरण: सापडलेला मृतदेह हा सना खान यांचा नसल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट; महिना होऊनही मृतदेहाचा पत्ता नाही


नागपूर15 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

भाजपा नेत्या सना खान यांचा मृतदेह मध्य प्रदेशातील गुमगाव येथील नदी पात्रातील विहिरीतून मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र, हा मृतदेह सना यांचा नसल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाल्यामुळे मग सनाचा मृतदेह गेला कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Advertisement

यापूर्वी सापडलेला महिलेचा मृतदेह सनाचा नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केल्यामुळे प्रकरणाचे गूढ वाढले होते. सनाच्या आईनेही मृतदेह सनाचा नसल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, सापडलेला मृतदेह नेमका सनाचा आहे किंवा नाही, यासाठी डीएनए चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता. त्यासाठी सनाच्या आईच्या रक्ताचे नमुनेही घेतले होते.

विहिरीतून प्राप्त मृतदेहाचे कपडे सना यांनी अखेरच्या दिवशी घातलेल्या कपड्यांशी मिळते-जुळते होते. त्यामुळे तो मृतदेह सना यांचा असल्याची शंका पोलिसांना होती. मात्र सनाच्या घरच्यांनी मृतदेह सनाचा नसल्याचे सांगितल्यामुळे मृतदेहाची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी स्थानिक न्यायालयातून परवानगी मिळवित, मृतदेहाचे नमुने घेण्यात आले. ते नागपूरच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले. डिएन टेस्टसाठी पोलिसांनी सना यांच्या आई मेहरुनिसा यांच्या रक्ताचे नमुने घेतले होते.

Advertisement

सना खानचा नवरा अमित ऊर्फ पप्पू साहू या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. रॉडने प्रहार करुन सना खानची हत्या केल्याची कबुली पप्पू साहू याने दिली आहे. त्यानंतर मृतदेह हिरेन नदीत फेकून दिला. पप्पू साहूने सना खान यांचा मृतदेह फेकला ती हिरेन नदी ३ किलोमीटरवर नर्मदा नदीला मिळते. मृतदेह हिरेन नदीतून नर्मदा नदीत वाहत आल्याची शक्यता होती. मात्र अजूनही पोलिसांना सनाचा मृतदेह सापडलेला नाही. पोलिसांनी मृतदेह शोधणाऱ्याला एक लाखांचे बक्षिसही जाहीर केले होते.

पप्पू साहूला यापूर्वीच जबलपूर येथून अटक करण्यात आली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला नागपूरात आणण्यात आले. सना खान आणि अमित शाहू यांनी रजिस्टर्ड लग्न केले होते. त्यानंतर काही महिन्यातच ही घटना घडली.

Advertisement

सना खान यांचा खून 2 ॲागस्टला झाला. आरोपी अमित साहू आणि सना खान यांच्यात पैशावरुन वाद झाला. त्या नंतर आरोपीने सना खान यांच्या डोक्यावर रॅाड मारला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. आरोपी अमित साहू हा जबलपूर येथील वाळू आणि दारु तस्कर आहे. सना खान भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकारी होत्या. व्यवसायातील भागिदारीवरून वाद झाल्याने अमितने सना खान यांना संपवले.Source link

Advertisement