सना खान हत्या प्रकरणाचे गूढ वाढले: ‘तो” मृतदेह भाजपा नेत्या सना खान यांचा नसल्याचे‎ डीएनए चाचणीतून झाले स्पष्ट‎

सना खान हत्या प्रकरणाचे गूढ वाढले: ‘तो” मृतदेह भाजपा नेत्या सना खान यांचा नसल्याचे‎ डीएनए चाचणीतून झाले स्पष्ट‎


नागपूर‎20 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

भाजपा नेत्या सना खान यांचा मृतदेह‎मध्य प्रदेशातील गुमगाव येथील‎‎ नदीपात्रातील ‎‎विहिरीतून ‎‎मिळाल्याचे‎‎ पोलिसांनी सांगितले ‎‎होते. मात्र, हा मृतदेह‎‎सना यांचा नसल्याचे‎ डीएनए चाचणीतून स्पष्ट झाल्याने ‎सनाचा मृतदेह गेला कुठे, असा प्रश्न‎ उपस्थित झाला आहे. यापूर्वी‎ सापडलेला महिलेचा मृतदेह सनाचा‎ नसल्याचा दावा कुटुंबीयांनी‎ केल्यामुळे प्रकरणाचे गूढ वाढले होते.‎

Advertisement

विहिरीतून प्राप्त मृतदेहाचे कपडे‎ सना यांनी अखेरच्या दिवशी‎ घातलेल्या कपड्यांशी मिळतेजुळते ‎होते. त्यामुळे तो मृतदेह सना यांचा ‎असल्याची शंका पोलिसांना होती. ‎मात्र सनाच्या घरच्यांनी मृतदेह सनाचा ‎नसल्याचे सांगितल्यामुळे मृतदेहाची‎ डीएनए चाचणी करण्याचा निर्णय‎ घेण्यात आला. त्यासाठी स्थानिक ‎न्यायालयातून परवानगी मिळवत, ‎मृतदेहाचे नमुने घेण्यात आले. ते‎ नागपूरच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये‎ तपासणीसाठी पाठवण्यात आले. ‎डीएनए टेस्टसाठी पोलिसांनी सना‎ यांच्या आई मेहरुन्निसा यांच्या रक्ताचे‎ नमुने घेतले होते.

सना खानचा नवरा ‎अमित ऊर्फ पप्पू साहू या हत्या प्रकरणात‎ मुख्य आरोपी आहे. रॉडने प्रहार करून‎सना खानची हत्या केल्याची कबुली पप्पू‎ साहू याने दिली आहे. त्यानंतर मृतदेह‎ हिरेन नदीत फेकून दिला. पप्पू साहूने सना ‎खान यांचा मृतदेह फेकला ती हिरेन नदी‎३ किलोमीटरवर नर्मदा नदीला मिळते. ‎मृतदेह हिरेन नदीतून नर्मदा नदीत वाहत ‎आल्याची शक्यता होती. मात्र, अजूनही ‎पोलिसांना सनाचा मृतदेह सापडलेला‎ नाही. पोलिसांनी मृतदेह शोधणाऱ्याला ‎एक लाखाचे बक्षीसही जाहीर केले‎ होते.‎

Advertisement



Source link

Advertisement