सनराईजर्स हैदराबाद समोर रॉयल्स चॅलेंजर बेंगलोरचे सपशेल लोटांगण

सनराईजर्स हैदराबाद समोर रॉयल्स चॅलेंजर बेंगलोरचे सपशेल लोटांगण
सनराईजर्स हैदराबाद समोर रॉयल्स चॅलेंजर बेंगलोरचे सपशेल लोटांगण

सनराईजर्स हैदराबादने आपला विनिंग फॉर्म बलाढ्य रॉयल चॅलेंजर बेंगलोर समोर देखील कायम राखला. त्यांनी प्रथम गोलंदाजी करताना आरसीबीला ६८ धावात गुंडाळले. त्यानंतर हे आव्हान एका फलंदाजाच्या मोबदल्यात ८व्या षटकात पार केले. हैदराबादकडून सलामीवीर अभिषेक शर्माने दमदार ४७ धावा ठोकल्या. तर कर्णधार केन विल्यमसनने सावध फलंदाजी करत १७ चेंडूत १६ धावा केल्या. मार्को जन्सन याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने ठेवलेले ६९ धावांचे माफक आव्हान सनराईजर्स हैदराबादच्या सलामीवीरांनीच पार करण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन यांनी पॉवर प्लेमध्येच ५६ धावा ठोकल्या. त्यात अभिषेक शर्माच्या आक्रमक ४७ धावांचा मोठा वाटा होता. मात्र सामना जिंकण्यासाठी ५ धावांची गरज असताना अभिषेक मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्यानंतर विल्यमसनने आठव्या षटकाच्या शेवट्च्या चेंडूवर षटकार मारत सामना जिंकून दिला.

Advertisement

टाटा इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या ३६ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये झाला. हैदराबादने तब्बल ९ विकेटने बंगळुरूला पराभूत केलं. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळला गेला. सनरायजर्स हैदराबादने या हंगामात आतापर्यंत ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत. या विजयासह गुणतालिकेत हैदराबाद पाचव्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर गेलाय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ८ पैकी ५ सामने जिंकले आहेत. बंगळुरूचा संघ या पराभवासह आयपीएल २०२२ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर गेला.

Advertisement

आयपीएलच्या इतिहासात बंगळुरू आणि हैदराबादमध्ये आतापर्यंत २० सामने झालेत. यात सनरायजर्स हैदराबादने ११ आणि आरसीबीने ८ सामने जिंकले. एक सामना रद्द झाला होता. भारतात दोन्ही संघात १६ सामने खेळले गेले. त्यातील हैदराबादने ८ आणि आरसीबीने ७ सामने जिंकले. एक सामना रद्द झाला होता.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इनिंग

Advertisement

बंगळुरूकडून सुयश प्रभुदेसाईने २० चेंडूत १५ धावा केल्या. यात त्याच्या एका चौकाराचा समावेश आहे. या सामन्यात १५ ही बंगळुरूच्या फलंदाजांपैकी सर्वाधिक धावसंख्या ठरली. यानंतर ग्लेन मॅक्सवेलचा क्रमांक येतो. त्याने ११ चेंडूत १२ धावा केल्या. त्यात मॅक्सवेलच्या २ चौकारांचा समावेश आहे. बंगळुरूच्या संघात प्रभुदेसाई आणि मॅक्सवेललाच दोन अंकी धावा काढता आल्या. इतर सर्व खेळाडू एकअंकी धावा काढत बाद झाले.

कर्णधार डु प्लेसिस ५ धावा (७ चेंडू), अनुज रावत ० धावा (२ चेंडू), विराट कोहली ० धावा (१ चेंडू), शाहबाज अहमद ७ धावा (१२ चेंडू), दिनेश कार्तिक ० धावा (३ चेंडू), हर्षल पटेल ४ धावा (८ चेंडू), वानिंदु हसरंगा ८ धावा (१९ चेंडू) आणि मोहम्मद सिराज २ धावा (४ चेंडू) करून बाद झाले. जोश हेजलवुड ११ चेंडूत ३ धावा करून नाबाद राहिले.

Advertisement