सनराईजर्स हैदराबादची विजयी घोडदौड कायम, पराभवातून धडा कसा घ्यावा हे विल्यमसनकडून शिकावे

सनराईजर्स हैदराबादची विजयी घोडदौड कायम, पराभवातून धडा कसा घ्यावा हे विल्यमसनकडून शिकावे
सनराईजर्स हैदराबादची विजयी घोडदौड कायम, पराभवातून धडा कसा घ्यावा हे विल्यमसनकडून शिकावे

सनराईजर्स हैदराबादने पंजाब किंग्जचे १५२ धावांचे आव्हान १९ व्या षटकात पार करून आपला चौथा विजय साकारला. हैदराबादने हे आव्हान ३ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. हैदराबादकडून माक्ररमने २७ चेंडूत ४१ तर निकोलस पूरनने ३० चेंडूत नाबाद ३५ धावांची खेळी केली. याचबरोबर राहुल त्रिपाठी (३४) आणि अभिषेक शर्मा (३१) यांनी देखील विजयात खारीचा वाटा उचलला. हैदराबादकडून गोलंदाजीत भवनेश्वर कुमारने ३ तर उम्रान मलिकने ४ विकेट घेतल्या. पंजाबच्या लिम लिव्हिंगस्टोनने ३३ चेंडूत आक्रमक ६० धावा करून एकाकी झुंज दिली.

पंजाबने दिलेल्या १५२ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या हैदराबादची सुरुवात खराब झाली. सलामीला आलेला केन विल्यम्सन रबाडाच्या चेंडूचा सामना करताना तीन धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर मात्र अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी या जोडीने संयमी खेळी केली. अभिषेक शर्माने २५ चेंडूमध्ये ३१ धावा केल्या. तर राहुल त्रिपाठीने २२ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि एक षटकार लगावत ३४ धावा केल्या.

Advertisement

त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ऐडन मरकराम आणि निकोलस पूरन ही जोडी संयमाने खेळ करत हैदरबादला विजयापर्यंत घेऊन गेली. ऐडन मरकरामने २७ चेंडूंमध्ये नाबाद ४१ धावा केल्या. तर निकोलस पूरनने ३० चेंडूंमध्ये नाबाद ३५ धावा केल्या. या जोडीने संयमाने खेळत हैदराबदच्या नावावर विजय नोंदवला. तर यापूर्वी नाणेफेक जिंकल्यानंतर सनरायझर्स हैदरबादने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबाने मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र सलामीला आलेली शिखर धवन आणि प्रभसिमरन ही जोडी चांगली खेळी करु शकली नाही. शिखर धवन जखमी झाल्यामुळे तो अवघ्या आठ धावा करुन झेलबाद झाला. तसेच प्रभसिमरन हादेखील फक्त १४ धावा करु शकला. दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या बेअरस्टोने १२ धावा केल्या.

Advertisement

त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनने मात्र धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने ३३ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि चार षटकार लगावत ६० धावा केल्या. त्याने केलेल्या या धावसंख्येमुळेच पंजाबला १५१ धावांपर्यंत मजल मारता आली. रितेश शर्मा ११ धावा करुन उमरान मलिकच्या चेंडूचा सामना करताना झेलबाद झाला. तर शाहरुख खानने पंजाबला सावरण्याचा काही प्रमाणात प्रयत्न केला. त्याने २६ धावा केल्या. शाहरुख खाननंतर मात्र पंजाबचा एकही फलंदाज धावा करु शकला नाही.

Advertisement

ओडेन स्मिथ १३ धावांवर असताना उमरान मलिकच्या चेंडूवर झेलबाज झाला. संघाच्या १५१ धावा झालेल्या असताना पंजाबचा अर्धा संघ बाद झाला. १५१ धावांनंतर पंजाबने एकही धाव न करता पाच गडी गमावले. शेवटच्या फळीतील रबाडा (०, नाबाद), राहुल चहर (०), वैभव अरोरा (०), अर्षदीप सिंग (०) या फलंदाजांनी पूर्ण निराशा केली. हैदरबादच्या गोलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी केली. हैदराबादने जोराचा मारा केल्यामुळे पंजाब संघ फक्त १५१ धावा करु शकला. उमरान मलिकने नेत्रदीपक कामगिरी केली. त्याने चार विकेट्स घेतल्या. तर त्याने टाकलेल्या चेंडूवरच पंजाबचा एक गडी धावबाद झाला. शेवटच्या षटकामध्ये उमरानने पंजाबच्या चार फलंदाजांना तंबूत पाठवलं. भुवनेश्वर कुमारने तीन बळी घेतले. तर टी नटरजान आणि जे सुचिथ यांनी प्रत्येक एक बळी घेतला.

Advertisement