मुंबई31 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
देशासमोर असलेले प्रश्न, समस्या या संदर्भात भाष्य करण्याऐवजी शरद पवारांची केवळ राजकीय भाषणबाजी सुरू आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात संभ्रम निर्माण करण्याएवढाच वेळ त्यांच्याकडे आहे, असा टोला भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनी लगावला आहे. या वेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांचाही चांगलाच समाचार घेतला.
शरद पवार हे कधीच भाजपसोबत येणार नाही, हे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. हे त्यांचे विधान केवळ हास्यास्पद असल्याचे सुधीर मुनगुंटीवर यांनी म्हटले आहे. ही त्यांची काँग्रेसमधील शेवटची निवडणूक असू शकते, असे वातावरण असल्याचेही ते म्हणाले.
विरोधी पक्ष नेत्यांचाही घेतला समाचार
विरोधी पक्ष नेत्यांच्या जुन्या भाषणांची क्लिप काढून ऐकवली आणि त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या संदर्भातील जुने मत पाहिले तर बरं होईल. ते नेहमी त्यांच्या भूमिका बदलतात, त्यामुळे भूमिका बदलून लोकांना आपल्या बाजूने करू शकत नसल्याचे, मुनगंटीवार म्हणाले.
राज्याच्या राजकारणासंबंधीत खालील महत्त्वाची बातमी देखील नक्की वाचा…
शरद पवार पुतण्या अजितदादाला का सोडू शकत नाहीत:शिवसेनेसारखा वाद नको, मालमत्तेच्या वाटणीचेही कारण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फारकत घेताच अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. 5 जुलै रोजी मुंबईतील वाय.बी.चव्हाण केंद्रात झालेल्या बैठकीत ते म्हणाले की, ‘शरद पवार यांचे वय झाले असून त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी. त्यांच्यात पूर्वीसारखा उत्साह नाही आणि त्यांना पक्षाचे नेतृत्व नीट करता येत नाही. अशा विधानांनंतरही शरद आणि अजित पवार एकाच छावणीत दिसतात. पक्षात ब्रेकअप झाल्यानंतर दोघे 4 वेळा भेटले आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की, तीन कारणांमुळे विभक्त झाल्यानंतरही दोघांना जवळ ठेवले आहे. एक म्हणजे पक्षावरचा हक्क, दुसरा म्हणजे शरद पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातला कौल आणि तिसरा पवार कुटुंबाच्या हजारो कोटींच्या मालमत्तेची वाटणी. पूर्ण बातमी वाचा….