मुंबई20 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
गेली अनेक दिवस युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे चर्चेत आहे. काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, यामुळे त्यांचे वडील सुधीर तांबे यांनी काँग्रेसने उमेदवारी देऊनही फॉर्म भरला नाही. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना या मतदारसंघातून शिवसेना आणि काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे.
सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून जरी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांचे कौतूक केल्याने तांबेच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना बळ आले होते. यावर जळगावमधील पदवीधर मतदार सुनील ठाकूर यांनी सत्यजित तांबेंना फोन करत आपली भूमिका नेमकी काय आहे, हे स्पष्ट करावी सभ्रम निर्माण होतोय असे म्हटले आहे. यावर सत्यजित तांबे यांनी दोन दिवसात भूमिका स्पष्ट करू असे सांगत त्या मतदाराची समजूत घातली असल्याची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे.
नेमके ऑडिओ क्लिपमध्ये काय?
सुनील ठाकूर, (मतदार) : दादा नमस्कार
सत्यजित तांबे : नमस्ते, बोला दादा
सुनील ठाकूर, (मतदार) : दादा, मी जळगाव येथून सुनील ठाकूर बोलत आहे. दोन दिवसांपासून जे टीव्हीवर पाहतोय, यामुळं परेशान होतो, मागच्या वेळेस बाबांना मतदान केलं, पण आता तुम्ही जो फॉर्म भरला, थोडा इरिटेड झालो मी, मतदार तुमचेच आहे, पक्ष आम्हाला काही माहित नाही, शेवटी एक विषय असा आहे की जो पदवीधरांसाठी लढतो, त्याच्यामागे पदवीधर असतात. सध्या लोकांना एक प्रश्न पडलेला आहे, की जायचं कुठे?
सत्यजित तांबे : आपले संबंध पारिवारिक आहेत, एकत्रच राहायचं, प्रश्नच येत नाही काही.
सुनील ठाकूर, (मतदार) : नेमके तुम्ही कुठे? हे लोकांना सांगायला हवे.
सत्यजित तांबे : मी अपक्ष आहे मी काँग्रेसचाच फॉर्म भरला होता मात्र एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून अपक्ष फॉर्म भरला.
सुनील ठाकूर, (मतदार): तुमचे एक वेगळे स्थान आहे, ज्याला पक्ष नाही, अलीकडे तुमचे युट्यूबवर असंख्य फॉलोअर्स वाढले. तुमच्या फॉलोअर्सला पक्षच नाही.
सत्यजीत तांबे : हा पक्ष राजकारणाच्या पलीकडेच काम करायचा आहे मला कुठल्याही राजकारणात अडकायचे नाही, असे मी आता ठरवले आहे.
सुनील ठाकूर, (मतदार) : दादा, आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच, मात्र तुमची भूमिका जाहीर होत नाही, त्यामुळे थोडा लोकांमध्ये संभ्रम आहे.
सत्यजित तांबे : लवकर भूमिका स्पष्ट करु, हे थोडे वादळ शांत होऊ देऊ, मी वादळ शांत व्हायची वाट पाहतोय, वादळात वादळ म्हटलं की गोंधळ होतो सगळे शांत होऊ देऊ मग बोलू आपण दोन दिवसांनी. 19 20 तारखेला बोलू आपण सगळी भूमिका सांगू आपण.
टीप : (सत्यजित तांबे यांच्या ऑडिओ क्लिपची दिव्य मराठी पुष्टी करत नाही)