‘सत्ता’कारण: राज्यात सुरू असलेला हिंसाचार 2004 च्या दंगलींचा पार्ट – 2, ‘एसआयटी’ चौकशीची मागणी करणार – संजय शिरसाट


मुंबईएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सध्या राज्यात सुरू असलेल्या दंगली या 2004 साली झालेल्या दंगलींचा पार्ट-2 आहे. सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही या दंगली घडवताय आणि खापर सरकारवर फोडताय, असा गंभीर आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

Advertisement

शिवसेनेचे शिष्टमंडळ आज सायंकाळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. राज्यात झालेल्या दंगलींमागे कोण आहे याचा शोध घेण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे.

नीतेश राणेंचे गंभीर आरोप

Advertisement

नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर 2004 साली उसळलेल्या दंगलीप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. राणे म्हणाले, भाजपवर दंगलींचे आरोप होत आहेत. मात्र उद्धव ठाकरेंविषयी कोणीही बोलत नाहीये. खरे तर दंगली घडवणारा मास्टरमाईंड कलानगर येथे बसला आहे. उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

SIT चौकशी व्हावी

Advertisement

नीतेश राणेंनी केलेल्या आरोपांवरुन आता शिवसेना एसआयटी स्थापना करण्याची मागणी करणार आहे. याबाबत संजय शिरसाट म्हणाले, 2004 साली झालेल्या दंगली आणि आता होत असलेल्या दंगली याबाबत SIT चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना करणार आहे.

महाराष्ट्रात दंगली होतात कशा?

Advertisement

संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले, महाराष्ट्रात दंगली होतात कशा? नीतेश राणेंनी केलेले आरोप हे गंभीर स्वरुपाचे आहेत. 2004 साली मातोश्रीत झालेल्या बैठकीत दंगली घडवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता झालेल्या दंगली जो कोणी घडवत असेल त्याची एसआयटी चौकशी व्हावी.

दंगली घडवणारे हेच…

Advertisement

संजय शिरसाट म्हणाले, तुम्हाला सत्ता हवी आहे म्हणून दंगली घडवताय. दंगलींचा पॅटर्न पुन्हा राबवला जात आहे. मात्र तुम्ही सरकारवर याचे खापर फोडत आहात. दंगली घडवणारे हेच आणि पाठीशी असणारे हेच. 2004 साली झालेल्या दंगलींचा हा पार्ट-2 आहे.

गृहमंत्र्यांची भेट घेणार

Advertisement

संजय शिरसाट म्हणाले, नीतेश राणेंचे स्टेटमेंट जबाबदारीने केलेले आहे. सदर व्यक्तीचे नावही त्यांच्याकडे आहे. एसआयटी चौकशी सुरु झाल्यावर त्यांच्याकडे पुरावे दिले जातील. संध्याकाळी गृहमंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देणार आहोत.

संबंधित वृत्त

Advertisement

टीका:संजय राऊत मुस्लिम लीगचे प्रवक्ते, दंगलींचे मास्टरमाईंड कलानगरला बसलेत, नीतेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे नियोजनबद्ध काम सध्या सुरु आहे, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे. दंगलींचे मास्टरमाईंट हे कलानगर येथे बसलेले असल्याचा आरोप नीतेश राणे यांनी केला आहे. वाचा सविस्तर

AdvertisementSource link

Advertisement