सडेतोड: पवार साहेबांऐवजी ठाकरेंकडे रडल्या असत्या, तर जास्त योग्य ठरले असते; अजितदादांचे सुषमा अंधारेंना तिखट उत्तर


पुणे3 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पवार साहेबांकडे रडण्यापेक्षा उद्धव ठाकरेंकडे रडला असता, तर ते जास्त योग्य ठरले असते. कारण विधानसभा अध्यक्षांएवढेच विधान परिषद अध्यक्षांनाही अधिकार आहेत, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुषमा अंधारेंना तिखट शब्दांत उत्तर दिले.

Advertisement

आमदारांनी आपल्याविरोधात अश्लील टिपण्णी केली. मात्र, त्यावर विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात आवाज उठवला नाही, अशी तक्रार सुषमा अंधारे यांनी नुकतीच शरद पवारांसमोर एका कार्यक्रमात केली होती. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. या तक्रारीला अजित पवारांनी आज सडेतोड उत्तर दिले.

काय म्हणाले दादा?

Advertisement

अजित पवार म्हणाले की, सुषमा अंधारे शिवसेना ठाकरे गटात आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे आहेत. मग तिथे पवार साहेबांसमोर रडण्यापेक्षा, भावनिक होण्यापेक्षा ते ज्या पक्षाचे काम बघत आहेत. ज्या पक्षासाठी बाबा रे, काका रे, मामा रे करत आहेत. सभा घेत आहेत. त्यांनी एवढा अजित पवारांचा उल्लेख करण्यापेक्षा ते ज्या पक्षाच्या आहेत, त्या पक्षाच्या विरोधीपक्ष नेत्यांना सांगितले पाहिजे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याला जेवढा अधिकार आहे, तेवढाच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याला आहे. त्यांना सांगा आपल्या मार्फत. तिथे रडण्यापेक्षा उद्धव ठाकरेंकडे रडला असता आणि अंबादास दानवेंना मुद्दा उपस्थित करायला सांगितला असता, तर जास्त योग्य ठरले असते.

आता अंधारे म्हणतात…

Advertisement

अजित पवारांच्या या तिखट उत्तरानंतर सुषमा अंधारे मवाळ झाल्यात. त्या म्हणाल्या की, मी अजित पवारांचे नाव घेतले नाही. मात्र, दादा आमच्या हक्काचे आणि जवळचे आहेत. त्यांच्याजवळ आम्ही अत्यंत आपुलकीने महाविकास आघाडीतला ज्येष्ठ नेता म्हणून बोलतो. त्यामुळे त्यांनी असे का बोलता म्हणून आम्हाला पारखं करू नये. ते आमच्यासाठी हक्काचे आहेत. मात्र, मी दादांचे नाव घेतले नाही. सभागृहात कुणीतरी विरोधी नेत्यांनी बोलावे एवढेच म्हणाले. मात्र, तक्रारीच्या बातम्या माध्यमांनी केल्या. आमच्या उपसभापती नीलमताईंकडूनही ती अपेक्षा असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

संबंधित वृत्तः

Advertisement

चुकत असेल तर कान पकडा म्हणत..:सुषमा अंधारेंनी शरद पवारांकडे केली अजितदादांची तक्रार; पाढा वाचताना अश्रू अनावर!

नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नको होता; अजित पवारांनी सांगितली नेमकी घोडचूक

Advertisement

अजित पवारांनी चूक कबूल केली यातच सगळे काही आले; नाना पटोले म्हणाले – भाजपने नेहमीच लोकशाहीचा गळा घोटला



Source link

Advertisement