पुणे2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावेळी ऑनलाईन बेटींग घेणाऱ्यांवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोंढवा परिसरात धनश्री सिग्नेचर सोसायटीतील फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या बेटींगवर खंडणी विरोधी पथकाने कारवाई करीत तिघाजणांना जेरबंद केले आहे.
त्यांच्याकडून पाच मोबाइल, लॅपटॉप, असे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली.
गुन्हा दाखल
इक्रमा मकसुद मुल्ला (रा . घोरपडी पेठ,पुणे),वसीम हनीफ शेख (रा . कोंढवा,पुणे), मुसाबित मेहमुद बाशाइब (रा सोमवार पेठ,पुणे ) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. मध्यप्रदेशातील बुकी अक्षय तिवारी आणि पबमालक जीतेश मेहता अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपीची नावे आहेत. याबाबत खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस कर्मचारी शंकर संपते यांनी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
ऑनलाईन बेटींग आली अंगाशी
गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक दोनचे अधिकारी अजय वाघमारे पथकासह कोंढवा हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी आयपीएल सामन्यातील खेळावर कोंढव्यात बेटींग सुरु असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून धनश्री सिग्नेचर सोसायटीत छापा टाकला असता, तिघेजण ऑनलाईन बेटींग घेताना आढळून आले.
त्यांच्याकडून पाच मोबाईल लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुकींमध्ये मध्यप्रदेशातील बुकी अक्षय तिवारी आणि पबमालक जीतेश मेहता यांच्याविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून ते पसार आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सतीश गोवेकर, खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी केली आहे.याबाबत पुढील तपास खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव करत आहे.