सचिव व सहसचिव पदावर कुणाची लागणार वर्णी ?: दर्यापूर तालुका सहकारी शेतकी ‘खविसं’ अध्यक्ष, उपाध्यक्षांची उद्या होणार निवड


अमरावती21 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली दि दर्यापूर तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सहसचिव पदाच्या निवडणूकीची घोषणा झाली असून शुक्रवारी (दि. १३) रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.

Advertisement

सदर निवडणूक प्रक्रीया शहरातील शेतकरी सदनात सकाळी ११ वाजता पासून सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन वडेकर, सहाय्यक अधिकारी दिपाली बुंदेले यांनी दिली. खविसच्या महत्त्वाच्या चारही पदावर कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली असून याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली दि दर्यापूर तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संघाची निवडणूक व निकाल मागील महिन्यात जाहीर झाला आहे. संस्थेच्या १७ संचालक पदाच्या जागासाठी ५१ उमेदवार थेट निवडणुकीत रिंगणात होते. निकालादरम्यान १७ पैकी १५ जागांवर काँग्रेसच्या सहकार पॅनलचे उमेदवार मोठ्या मताच्या फरकाने निवडूण आले आहेत. प्रतिस्पर्धी शेतकरी पॅनलला फक्त २ जागा काबीज करून समाधान मानावे लागले, तर किसान-समता पॅनलला खातेही उघडता आले नाही. खविसंची हि निवडणूक राजकीयदृष्ट्या चांगलीच प्रतिष्ठेची ठरली होती. खविसंच्या १७ संचालक पदाच्या पार पडलेल्या निवडणुकीत ३ पॅनल निवडणूक रिंगणात होते. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत सहकार पॅनलने १५ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सहसचिव सहकार पूनलचाच होईल यात शंका नाही.

Advertisement

मात्र निवडूण आलेल्या दिग्गजांमध्ये प्रामुख्याने अध्यक्ष पदासाठी बाळासाहेब टोळे, माजी उपाध्यक्ष गजानन जाधव व प्रभाकर पाटील कोरपे यांच्यासह इतर नावे चर्चेत असल्याचे सहकार क्षेत्रात बोलल्या जात आहे. सहकार पॅनल प्रमुख आमदार बळवंत वानखडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे, माजी जि. प. सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित संचालक मंडळ वेळेपर्यंत कोणाची अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव व सहसचिव पदावर वर्णी लावतात, हे चित्र शुक्रवारी दुपारनंतरच स्पष्ट होईल.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement