सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाला सलग सात सामने हरलेली मुंबई इंडियन्स जिंकून देऊ शकते गिफ्ट

सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाला सलग सात सामने हरलेली मुंबई इंडियन्स जिंकून देऊ शकते गिफ्ट
सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाला सलग सात सामने हरलेली मुंबई इंडियन्स जिंकून देऊ शकते गिफ्ट

ज्याच्या शिवाय क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही, अशा जगातील महान, किर्तीवंत सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. आपल्या नजातकभऱ्या खेळाने सचिनने अवीट, स्वर्गीय आनंद आपल्या चाहत्यांना दिला. अगणित आनंदाचे क्षण सचिनने आपल्या चाहत्यांना दिले आणि अनेकांच्या मनातील सिंहासनावर तो कायमचा आरुढ झाला आहे. पण सचिनला आता त्याच्या या वाढदिवशी मुंबई इंडियन्स एक खास गिफ्ट देऊ शकतं.

सचिन तेंडुलकरने आतापर्यंत अनेकांना आपल्या खेळाने अवीट आनंद दिला आहे. सचिनचे शतक म्हणजे प्रत्येकाला आपल्यासाठीचे एक गिफ्टच वाटायचे. पण आता आज सचिनचा वाढदिवस आहे. सचिनच्या या वाढदिवशी त्याला एक अविस्मरणीय गिफ्ट मुंबई इंडियन्सचा संघ देऊ शकतो. सचिनला आयुष्यभर लक्षात राहील, असं कोणतं गिफ्ट सचिनला मिळू शकतं.

Advertisement

एक असं गिफ्ट जे सचिनला आयुष्यभर लक्षात राहीलं

सध्याच्या घडीला आयपीएल सुरु आहे आणि सचिन हा मुंबई इंडियन्सचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सचिनशिवाय मुंबई इंडियन्स पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळेच लाडक्या सचिनला त्याच्या वाढदिवशी खास गिफ्ट मुंबई इंडियन्सचा संघ देऊ शकतो. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा आठवा सामनाही सचिनच्या वाढदिवशीच होणार आहे.आतापर्यंतच्या सातही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला एकही विजय मिळवता आलेला नाही. खेळाडूंबरोबर चाहतेही आता विजयासाठी आसूसलेले आहे. हा विजयाचा योग आता सचिनच्या वाढदिवशी येऊ शकतो आणि मुंबई इंडियन्सचा संघ हेच अविस्मरणीय गिफ्ट सचिनला देऊ शकतो. कारण आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये अजूनपर्यंत एकदाही मुंबई इंडियन्सचा संघ सलग सात सामने पराभूत झालेला नाही. त्यामुळे हा हंगाम सर्वांच्या कायम लक्षात राहील. त्याचबरोबर या सात पराभवानंतर मिळालेला विजय कोणीही कधीच विसरू शकणार नाही. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स अजून एक खास गोष्ट सचिनसाठी करू शकते.

Advertisement

आतापर्यंच्या सातही सामन्यांमध्ये मुंबईची गोलंदाजी ही वाईट झालेली आहे. त्यामुळे सचिनच्या वाढदिवशी त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी मुंबई इंडियन्सचा संघ देऊ शकतो. त्यामुळे हा वाढदिवस सचिन आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. आतपर्यंत अर्जुनला संधी का दिली नाही, असा प्रश्न चाहते सातत्याने विचारत आहेत. त्यामुळे सचिनच्या वाढदिवसाचा योग साधून मुंबई इंडियन्सचा संघ ही खास गोष्ट करू शकतो. त्यामुळे आता उद्याच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ या दोन अविस्मरणीय गोष्टी सचिनला देणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.

आतापर्यंत सचिनने सर्वांनाच चांगल्या आठवणी दिल्या आहेत. त्यामुळे सचिनचा वाढदिवशी या दोन्ही गोष्टींनी गोड होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा रविवारचा सामना हा सर्वात महत्वाचा समजला जात आहे. मुंबई इंडियन्सने या सामन्यात सचिनसाठी विजय साकारायला हवा, अशी चाहत्यांची इच्छा आहे.

Advertisement

Advertisement