पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएसन स्टेडियममध्ये आयपीएल २०२२चा १४वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला श्रेयस अय्यरच्या केकेआरने ५ विकेट्स राखून मात दिली. मुंबईचे आयपीएलच्या चालू हंगामातील प्रदर्शन आतापर्यंत खूपच निराशाजनक राहिले आहे. तसेच, चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेला संघ चेन्नई सुपर किंग्जसाठीही हा हंगाम आतापर्यंत खूपच खराब गेला आहे.
मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ५ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत, तर चेन्नई सुपर किंग्जने ४ वेळा ही कामगिरी केली आहे. मात्र, या दोन्ही महत्वाच्या संघांचे चालू हंगामातील प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. दोन्ही संघांनी त्यांचे पहिले तीन सामने गमावले आहेत आणि दोन्ही संघाची नावे गुणतालिकेत एकापाठोपाठ एक आहेत. गुणतालिकेत सीएसके ८व्या आणि मुंबई ९व्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांकडे शून्य गुण आहेत.
मुंबईला पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून ४ विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने २३ धावांनी मुंबईला धूळ चारली होती आणि आता तिसऱ्या सामन्यात केकेआरने ५ विकेट्सने मुंबईला मात दिली आहे. दुसरीकडे सीएसकेचा विचार केला, तर त्यांना पहिल्या सामन्यात केकेआरकडून ६ विकेट्सने पराभव मिळाला होता. दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने ६ विकेट्स राखून सीएसकेला पराभूत केले होते. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने सीएसकेविरुद्ध ५४ धावांनी विजय मिळवला.
मुंबई इंडियन्ससाठी हे नवीन नाहीये की, हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्यांचा संघ खराब प्रदर्शन करत आहे, पण सीएसकेसाठी हे मोठे अपयश आहे. सीएसकेने यापूर्वी कधीच सुरुवातीच्या सलग दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करला नव्हता. मात्र, या हंगामात सीएसकेने सुरुवातीच्या सगल तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे.
केकेआर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियन दिग्गज पॅट कमिन्स याने सामन्यात कमाल केली. त्याने अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक करत केएल राहुलच्या विक्रमाची बरोबरी केली. या सामन्यात त्याने एकूण १५ चेंडू खेळले आणि यामध्ये ५६ धावा ठोकल्या. त्याच्या फटकेबाजीमुळे केकेआरने मुंबईकडून मिळालेले १६२ धावांचे लक्ष्य १६व्या षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर गाठले.