छत्रपती संभाजीनगर35 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी राजाबाजार येथील संस्थान गणपतीहून २२ मार्चला दुपारी ३ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सिटी चौक, गुलमंडीमार्गे ७ वाजता खडकेश्वर मंदिरावर ही शोभायात्रा पोहोचेल. यामध्ये ६४ हिंदू संघटना सहभागी होणार आहेत. सजीव-निर्जीव देखाव्यांसह पारंपरिक वेशभूषांतून महिला-पुरुष शोभायात्रेचे आकर्षण असतील.
याविषयीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार चंद्रकांत खैरे, हिंदू नववर्ष स्वागत समिती अध्यक्ष जयवंत (बंडू) ओक, माजी महापैार नंदकुमार घोडेले उपस्थित होते. या वेळी सिंधी समाज अध्यक्ष किशनचंद तनवाणी म्हणाले, हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याच्या उद्देशाने या सर्व संघटना एकत्र येतात. हे शक्तिप्रदर्शन नसून एकत्रित उत्सवात सहभागी होण्याचा आनंद आहे. ही शोभायात्रा एक परंपरा आहे. खडकेश्वरला शोभायात्रेचा समारोप होईल. यामध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे.