संशयितांमधील दोन महिलांनी नोंदवले जबाब: घरकुल निविदाप्रकरणी ‘ईडी’पाठोपाठ आता पोलिसांनी आरोपींना बोलावले


छत्रपती संभाजीनगर2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

महापालिकेमार्फत राबवण्यात येत असलेल्या पंतप्रधान घरकुल योजनेच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळाप्रकरणी गुन्हे शाखेने सर्व आरोपींना नोटिसा पाठवल्या आहेत, त्याचबरोबर काहींचे जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.मनपाने गेल्या वर्षी या योजनेच्या ३१ मार्चपूर्वी तातडीने निविदा मागवण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेत कंत्राटदारांनी रिंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी २४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांच्याकडे याप्रकरणी तपास सोपवण्यात आला.

Advertisement

तपासात मनपाकडे कागदपत्रांची मागणी केली. मात्र, ती सर्व कागदपत्रे झेरॉक्स स्वरूपातील होती. त्यामुळे पथकाने मनपा प्रशासनाकडे ठोस तपासासाठी मूळ कागदपत्रांची मागणी केली. त्यात बराच वेळ गेला. त्यानंतर पथकाने १९ आरोपींना पोलिस आयुक्तालयात हजर राहण्यासाठी नोटिसा पाठवल्या. त्यात दोन महिला आरोपींनी हजेरी लावली. मात्र, त्यांना केवळ सह्यांचा अधिकार असल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांचा आता तांत्रिक भर तपासावर असून, सायबर पोलिसांचे स्वतंत्र पथक त्यासाठी मदत करत आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement