छत्रपती संभाजीनगर3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
उच्च माध्यमिक परीक्षेतील उत्तरपत्रिकेत अनियमितता, गैरप्रकार, पाने फाडलेली आणि हस्ताक्षरात बदल झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी विद्यार्थ्यांबरोबरच मॉडरेटर, कास्टोडियन यांची शनिवार (दि. १३) मे पर्यंत सुनावणी घेण्यात आली असून, सोमवारी (दि. १५ मे) रोजी केंद्रप्रमुखांची देखील कसून चौकशी करत विद्यार्थ्यांप्रमाणेच प्रश्न विचारण्यात आले. या अक्षरबदल प्रकरणात केंद्रप्रमुख संशयाच्या घेऱ्यात असून, त्यांना विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने नोटीस पाठविण्यात आली असून, अंबाजोगई, पैठण येथील केंद्रप्रमुखांना सोमवार दि. १५ मे पासून सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आल्या. या परीक्षेतील इयत्ता बारावीच्या साडेपाचशे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत गैरप्रकार आढळून आला आहे. ३९४ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत हस्ताक्षरात बदल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आमचे हे हस्ताक्षर नाही कुणी लिहिले माहिती नाही यात आम्ही दोषी नसल्याचे विद्यार्थ्यांनी सुनावणी दरम्यान लेखी हमीपत्रात म्हटले होते.
त्यानंतर शनिवारी मॉडरेटर, कस्टोडियनची देखील चौकशी करण्यात आली आहे. यानंतर सोमवारी सकाळच्या सत्रात केंद्रप्रुखांना मंडळात बोलवण्यात आले होेते. विद्यार्थ्यांना ज्या प्रमाणे चौकशीत विचारण्यात आले होते की, उत्तरपत्रिकेतील अक्षर बदलाविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? पर्यवेक्षक कोणे होते ? पेपर कुठे तपासून गेले असे प्रश्न विचारण्यात आले.
उत्तरपत्रिकेत उत्तराशिवाय कोणताही मजकूर लिहिल्यास त्यास नियमानुसार आक्षेपार्हय लेखन म्हटले जाते. जसे की खुना करणे, कागद फाडणे, भावनिक लिखान आक्षेपार्हय मानले जाते. आतापर्यंत पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांची यात सुनावणी झाली आहे. हस्ताक्षरातील बदल हा फिजिक्सच्या पेपरमध्येच आढळून आला असल्याने त्या विषयाचे विद्यार्थीनंतर विभागीय मंडळाने नोटीस पाठवून केंद्रप्रमुखांकडून खुलासा मागितला . तसेच त्यांना सुनावणीसाठी देखील बोलवले होते .
तपासणीसाठी न आलेल्यांना नोटीस
दरम्यान उत्तरपत्रिका तपासणीसाठी वारंवार पत्र देवूनही उत्तरपत्रिका न तपासता परत पाठवल्या प्रकरण माहिती घेवून त्या महाविद्यालय, शाळांना, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य, मुख्याध्यापकांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली.