संभाजीनगर जिल्हा बॅंकेंच्या अध्यक्षपदी अर्जुन गाढे यांची बिनविरोध निवड: सत्तारांचेच पारडे ठरले जड; सूचक नितीन पाटील तर अनुमोदक कृष्णा डोणगावकर

संभाजीनगर जिल्हा बॅंकेंच्या अध्यक्षपदी अर्जुन गाढे यांची बिनविरोध निवड: सत्तारांचेच पारडे ठरले जड; सूचक नितीन पाटील तर अनुमोदक कृष्णा डोणगावकर


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Arjun Gadhe Elected Unopposed As Chairman Of Sambhajinagar District Bank | Sambhajinagar District Cooperative Bank, Minister Abdul Sattar Rahe Bhari, Nitin Patil,

औरंगाबाद13 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सोमवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पाडली. अर्जदार अर्जुन गाढे यांनी तीन प्रतीत अर्ज सादर केले होते. निवड झालेल्या अर्जावर सुचक खुद्द माजी अध्यक्ष नितीन पाटील व अनुमोदक कृष्णा डोणगावकर यांनी स्वाक्षरी केली. एकच अर्ज आल्याने गाढे यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली.

Advertisement

पहिल्यांदा राजकीय वारसाला डावलून सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलाला अध्यक्ष केल्याची नोंद झाली आहे. यामध्ये मंत्री तथा संचालक अब्दुल सत्तार यांचेच पारडे जड ठरले. मंत्री संदीपान भुमरे व विधान परिषद विरोधी पक्ष नेता तथा संचालक अंबादास दानवे अनुपस्थित होते.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व संचालक मंडळाने राजकीय वारसा हक्काने अध्यक्ष झालेले नितीन पाटील यांच्या विरोधात तक्रार देऊन त्यांना पदमुक्त करण्याची मागणी केली होती. सर्वच संचालक विरोधात गेल्याने नितीन पाटील यांनी राजीनामा एका ओळीत राजीनामा लिहून देण्याची नामुष्की आढावली. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी सव्वा महिन्यानंतर ११ सप्टेंबर रोजी ११.३० ते १ वाजेपर्यंत जिल्हा उपनिबंधक तथा अध्यक्ष डॉ. मुकेश बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. गाढे यांचा एकच अर्ज प्राप्त झाला होता. संचालकांनी सर्वानुमते उपाध्यक्ष अर्जुन गाढे यांचीच अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली.

Advertisement

फटाक्यांची आतिषबाजी

गाढे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड होताच बँके समोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिषबाजी केली. गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. तसेच गाढे यांचे स्वागत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. सर्वांनी पुष्पगुच्छ, हार, शाल देऊन त्यांच्या निवडीचे स्वागत केले.

AdvertisementSource link

Advertisement