संपाचा फटका टाळण्यासाठी हालचाली: घाटीमध्ये अतिरिक्त 35 कर्मचाऱ्यांसाठी अधिष्ठातांनी पाठवला वैद्यकीय शिक्षण आयुक्ताकडे प्रस्ताव



छत्रपती संभाजीनगर44 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संपाचा फटका बसू नये यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने हालचाली सुरू केल्या आहेत. अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी वैद्यकीय शिक्षण आयुक्त यांच्याकडे अतिरिक्त 35 कर्मचारी मागवण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे.

Advertisement

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटीमध्ये परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. घाटीतील 700 नर्सेस तसेच 438 कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्या तुलनेत केवळ 210 नर्सेस या नर्सिंग कॉलेजमधून मागविण्यात आले आहेत. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नर्सिंग कॉलेजमधून 140 तर कमलनयन बजाज नर्सिंग महाविद्यालयातून आलेल्या 60 विद्यार्थिनी रुग्णसेवा देत आहेत.

घाटीमध्ये कर्मचारी संपावर गेल्यामुळे रुग्णसेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. पहिल्याच दिवशी पंधरा नियोजित ऑपरेशन रद्द करण्यात आली होती. तसेच कर्मचारी संपामुळे मोठ्या प्रमाणात घाटी मध्ये अस्वच्छतेचे चित्र पाहायला मिळाले होते.अस्वच्छता वाढल्यामुळे घाटी परिसरात दुर्गंधी देखील पसरली होती.

Advertisement

बुधवारी सुट्टी असल्यामुळे ओपीडी बंद

बुधवारी जिल्हाधिकारी घोषित नाथ षष्ठी मुळे सुट्टी होती. त्यामुळे ओपीडी बंद असल्यामुळे रुग्ण देखील आले नव्हते त्यामुळे काही प्रमाणात घाटी प्रशासनाला दिलासा देखील मिळाला. तसेच घाटीत दाखल असलेल्या रुग्णांवर उपचार करणे काही प्रमाणात सोपे गेले. याबाबत माहिती देताना वैद्यकीय अधीक्षक विजय कल्याणकर यांनी सांगितले की घाटी प्रशासनाने 15 तसेच 20 कर्मचारी यांचा प्रस्ताव आयुक्ताकडे पाठवला आहे त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाल्यास आणखी जास्तीचे कर्मचारी घाटी प्रशासनाला मिळतील तसेच रुग्णसेवर परिणाम होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असे आवाहन देखील त्यांनी केले. – विजय कल्याणकर, वैद्यकीय अधीक्षक घाटी

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement