संत निवृत्तीनाथाच्या दर्शनासाठी येणार 3. 50 लाख वारकरी: 170 बाय 90 फुटांची उभारली दर्शनबारी; निर्मलवारीसाठी प्रशासन सज्ज


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • 3.50 Lakh Pilgrims Will Come For The Darshan Of Saint Nivrittinath, A Darshanbari Of 170 Feet By 90 Feet; Administration Ready For Nirmalwari

नाशिक8 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मुखी पांडुरंगाचे भजन..ग्यानबा तुकाराम नामस्मरण करत दिंडीच्या माध्यमातून लाखाेंच्या संख्येने वारकरी त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर येथे दाखल हाेत आहे.काेराेनाचे निर्बंध यंदा हटल्याने तब्बल दाेन वर्षांनतर वारकरी निवृत्तीनाथ भेटीचा साेहळा पार पडणार आहे. या साेहळ्यासाठी 500 हून अधिक दिंडीच्या माध्ममातून 3.50 लाखांहून अधिक भाविक त्र्यंबकेश्वरला दाखल हाेणार आहे. वारकऱ्यांच्या साेईसाठी मंदिराच्या बाहेर 170 बाय 90 फुटाची दर्शनबारी उभारण्यात आली असून मंडपाची देखील व्यवस्था असणार आहे.

Advertisement

वारकऱ्यांमध्ये पंढरपूर प्रमाणेत संत निवृत्तीनाथ यात्रेचे विशेष महत्व असते. यंदा 20 जानेवारी पर्यत हा यात्राेत्सव रंगणार असून टप्पाटप्याने नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथे दिंड्या दाखल हाेत आहे. 500 हून दिंड्या येेणार असल्याने प्रशासनासह संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानच्या वतीने वारकऱ्यांच्या सुविधेसाठी विशेष नियाेजन करण्यात आले आहे. येत्या 16 ते 20 जानेवारी दरम्यान त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव होणार आहे. सध्या मंदिराच्या जिर्णोधाराचे काम सुरू आहे. यात्रा काळात राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी त्र्यंबक नगरीत दाखल होतात.यामुळे वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण हाेवू नये या दृष्टीने मंदिर परिसरात असल्याने या ठिकाणी भव्य असा कृत्रिम सभामंडप साकारण्यात येत आहे.

तसेच वारकऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी दर्शन बारी वरही मंडप उभारण्यात येत आहे.त्याचबरोबर उत्सव काळात देवस्थान परिसराला आकर्षक सजावट करण्यात येणार असून लाल गालीचा वापर करण्यात येणार आहे. संत निवृत्तीनाथ यात्रा निर्मल वारीसारखी व्हावी यासाठी देवस्थानच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे यांनी दिली.

Advertisement

श्रीफळ देवून दिंड्यांच्या हाेणार सन्मान

निवृत्तीनाथ यात्रेसाठी राज्यातून ठिकठिकाणाहून दिंड्या येत असतात.शेकडाे किलाेमीटरचा पायी प्रवास करत येणाऱ्या या दिंड्याच्या स्वागत निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. मानाच्या दिंड्यांसाठी राहुट्यांची व्यवस्था करण्यात येार असून त्यांना श्रीफळ, प्रसाद देवून त्यांचा सन्मान करणार आहे.​​​​​​

Advertisement

निर्मलवारीसाठी प्रशासन सज्ज

यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे लाखाेंच्या संख्येने वारकरी दाखल हाेत आहे. याचमुळे यंदाची वारी निर्मलवारी व्हावी यासाठी देवस्थानसह प्रशासन देखील सज्ज झाले आहेत. 1500 स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली असून पिण्याच्या पाण्यासाठी ८ टॅकरची व्यवस्था असणार आहे.

Advertisement

महापुजेचे असे असणार नियाेजन
संत निवृत्तीनाथ यात्रेनिमित्त मंगळवारी दि. 17 रात्री 11 वाजता देवस्थानच्या वतीने महापूजा तर बुधवारी दि. 18 प्रशासनाच्या वतीने महापूजा करण्यात येणार आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement