पुणे10 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
शिक्षणासाठी पश्चिम बंगाल येथुन पुण्यात येऊन राहत असलेली 18 वर्षीय तरुणी रिक्षाने प्रवास करत असताना, तिचा विनयभंग करत तिच्या अंगावर झाेपण्याचा प्रयत्न करुन चुंबन घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनाेळखी रिक्षा चालका विराेधात पिडित तरुणीने चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, सदरचा प्रकार 16 मार्च राेजी सायंकाळी पाच ते पावणेसहा वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. सदर दिवशी पिडित तरुणी ही एमआयटी काेथरुड ते पुणे विद्यापीठ या दरम्यान सचिन नावाचा अनाेळखी रिक्षा चालक याच्या रिक्षात प्रवास करत हाेती. त्यावेळी रिक्षात तरुणी एकटीच प्रवास करत असल्याचे पाहून, रिक्षाचालकाने तिचा हात पकडून तिचे शर्टचे वरुन हात घालून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केले. तरुणीने रिक्षाचालकास विराेध केला.
आराेपीने रिक्षा विद्यापीठमध्ये थांबवून मागील सीटवर येऊन तरुणीच्या अंगावर झाेपण्याचा प्रयत्न करत गालाचे चुंबन घेतले. तरुणीने त्यास विराेध करुन ती रिक्षाचे बाहेर आली असता, आराेपीने जबरदस्तीने तिचा माेबाईल क्रमांक घेऊन सचिन नावाने नंबर सेवा केला आहे. रिक्षाचालकाच्या तावडीतून तरुणीची सुटका झाल्यानंतर, तिने थेट पोलिस ठाणे गाठत आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत चतुश्रृंगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस गायकवाड पुढील तपास करत आहे.
घरात शिरुन महिलेचा विनयभंग
चतुश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडारवाडी परिसरात राहत असलेल्या एका 30 वर्षीय महिला घरात 16 मार्च राेजी एकटी झाेपलेली हाेती. त्यावेळी साेन्या डाेंगरे (रा.वडारवाडी,पुणे) या आराेपीने महिलेच्या घरात बेकायदेशीर प्रवेश करुन तिच्या अंगाला स्पर्श केला. त्यामुळे महिला जागी झाली असता तिने तु इतक्या रात्री कसा काय इथे आला अशी विचारणा केली असता त्याने तिच्याशी शारिरिक जवळीक साधत तिच्या अंगावर झाेपण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केला आहे.