संगीत दिन विशेष: 1934 पासूनचा ग्रामोफोन ते अडीच हजार ग्रामोफोन रेकॉर्ड जमवणारा छंदी


अहमदनगर21 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

संगीत हा मनुष्याच्या आयुष्यातील अिवभाज्य घटक. पूर्वीच्या काळात गाणे ऐकण्यासाठी ग्रामोफोनचा वापर केला जात होता. तेच एकमेव करमणुकीचे साधन होते. अशाच हिंदी, मराठी गाण्यांचे ग्रामोफोन रेकॉर्ड जमवण्याचा अनोखा छंद नगरमधील बांधकाम विभागातील सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता एस. आर. गुंजाळ यांनी जोपासला आहे. त्यांच्याकडे 1934 या वर्षांतील ग्रामोफाेन आहे, तो आजही सुस्थितीत आहे. तसेच 1940 आणि 1061 मधील ग्रामाेफाेनही त्यांच्याकडे आहेत.

Advertisement

गुंजाळ यांच्या विविध प्रकारचे ग्रामोफोन हे तर या छंदाचे वैशिष्ट. त्यांच्याकडे अडीच हजार ग्रामोफोन रेकॉर्ड असून त्यात इपी, एलपी, ७८ आरपीएम रेकॉर्ड, स्कूल टेप रेकॉर्डर, स्कूल (रिल टू रिल) यांचा संग्रह आहे.

लहानपणापासूनच गाण्याची आवड असल्याने ग्रामोफोनचे गारुड त्याकाळीच मनावर चढले आणि ते ग्रामोफोनच्या प्रेमात पडले. आतापर्यंत त्यांनी विविध ठिकाणाहून 17 ग्रामोफोन जमवले. त्यापैकी 3 मेकॅनिकल ग्रामोफोन, 4 इलेक्ट्रीक ग्रामोफोन, 2 यूएसबी ग्रामोफोन त्यांच्या संग्रही आहेत. ते सर्व सुरू आहेत. अडीच हचार हजार हिंदी, मराठी गाण्यांचे रेकॉर्ड्स जमवल्याचे सांगितले.

Advertisement

चावी मारली की…

माझ्या लहानपणी ग्रामोफाेन हे करमणुकीचे साधन होते. चावी मारली की गाणे वाजायचे. त्याला वीज नाही, बॅटरी नाही, याचे कुतुहल होते. त्यामुळे जुन्या काळातील सदाबहार गाणी ऐकणं हा छंद मला जडला. मी ग्रामोफोन अधूनमधून लावतो आणि जुन्या आठवणींना उजाळा देतो. आजच्या सीडीच्या युगातही जुन्या पण उत्तम अवस्थेतील ग्रामोफोनवर गाणी ऐकणं ही एक दुर्मिळ पर्वणी आहे, असे गुंजाळ सांगतात.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement