श्वानावरुन भांडण: पोलिस चौकीत तरुणीचा राडा; अर्वाच्च भाषेत पोलिस कर्मचार्‍याला शिवीगाळAdvertisement

पुणे43 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

श्वानाने घाण केल्याच्या कारणावरुन दोन शेजार्‍यामध्ये वाद झाला. त्यातून तरुणी व तिच्या आईने लहान मुलाच्या अंगावर धावून जात मुलाच्या आईला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच त्यांच्या वाहनांची देखील तोडफोड केली. त्यानंतर आई व भावासोबत ही 21 वर्षाची तरुणी कर्वेनगर पोलिस चौकीत गेली. तेथे तिची तक्रार नोंदवून घेऊनही तिने महिला पोलिस अंमलदाराला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.

Advertisement

ही घटना कर्वेनगरमधील गुरुप्रसाद कॉलनीत रविवारी दुपारी दीड वाजता आणि सायंकाळी 4 ते 6 वाजण्याच्या दरम्यान कर्वेनगर पोलिस चौकीत घडली आहे. याप्रकरणी सुनिता ज्ञानेश्वर दळवी (वय 45, रा. गुरुप्रसादा कॉलनी, कर्वेनगर) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संजना किरण पाटील (वय 40) आणि मृणाल किरण पाटील (वय 21, रा. गुरुप्रसाद कॉलनी, कर्वेनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement