श्रेयस अय्यरने धक्कादायक माहिती दिली,” म्हणाला संघ निवडताना मॅनेजमेंटने केला हस्तक्षेप”

श्रेयस अय्यरने धक्कादायक माहिती दिली,” म्हणाला संघ निवडताना मॅनेजमेंटने केला हस्तक्षेप”
श्रेयस अय्यरने धक्कादायक माहिती दिली,” म्हणाला संघ निवडताना मॅनेजमेंटने केला हस्तक्षेप”

आयपीएलच्या १५ व्या हंगामातील ५६ वा सामना काल नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स  यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स संघाने ५२ धावांनी मोठा विजय मिळवला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाने एक-दोन नव्हे तर एकूण पाच बदल केले होते. सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने काही गोष्टी सांगितल्या ज्या खूप आश्चर्यकारक होत्या.

खरे तर कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह संघ मैदानात उतरणार, हे कर्णधार आणि प्रशिक्षक परिस्थितीनुसार ठरवतात. पण कोलकाता नाइट रायडर्स संघ कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार हे संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर ठरवता, याचा खुलासा खुद्द श्रेयस अय्यरने केला आहे.

Advertisement

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनबद्दल बराच वेळ विचार झाला. त्यावर श्रेयस अय्यर म्हणाला की, या बैठकीत कोचशिवाय संघाचे सीईओही उपस्थित होते. यादरम्यान आज कोणते खेळाडू मैदानात उतरणार आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवायचा हे ठरले. आजच्या सामन्यात या संधी खेळाडू मिळणार नाही. अशी माहिती प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्क्युलम यांनी दिली. त्यानंतर या निर्णयाशी सर्व खेळाडू सहमत असल्याचे दिसून आले.

आता अशा स्थितीत मला प्रश्न पडला आहे की, संघ निवडीत सीईओचे काम काय? वेंकी म्हैसूरला क्रिकेटचा अनुभव आहे असे नाही. कालचा सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा संघ हरला असता तर कोणाची जबाबदारी होते ? कारण सामन्यात कोणत्या खेळाडूसह मैदानात उतरायचे हे फक्त कर्णधार आणि प्रशिक्षकच चांगले समजू शकतात. दुसरीकडे, जर सीईओने संघ निवडीत हस्तक्षेप केला तर त्याचा संघाच्या कामगिरीवरही वाईट परिणाम होऊ शकतो.

Advertisement