श्री क्षेत्र जेजुरी गडांवर बहुमाध्यम प्रदर्शनाचे आयोजन: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचे औचित्य


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Organized Multimedia Exhibition On Jejuri | Amrit Mahotsav Of Indian Independence | Celebration Of International Year | Pune News |

पुणे16 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र जेजुरी गड हे लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्याच पवित्र स्थानी आता वेगळा उपक्रम होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो प्रादेशिक कार्यालय पुणे व श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 या विषयांवर आधारित बहूमाध्यम प्रदर्शनाचे आयोजन श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी गड ता. पुरंदर येथे 24 ते 28 जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील 1857 ते 1947 या कालखंडातील महत्वाच्या घटना-घडामोडी आणि महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा अत्यंत संक्षिप्त माहिती आणि बहूमाध्यमातून दर्शविण्यात येणार आहे.

Advertisement

संयुक्त राष्ट्र संघटनेने 2023 हे वर्षे आंतरराष्ट्रीय तृणधान्य पौष्टिक वर्ष म्हणून घोषित केले आहे. यानिमित्ताने तृणधान्यातील पौष्टिक घटकांची माहिती नागरिकाला होण्यासाठी ज्वारी, बाजरी, नाचनी, वरई, राळ, राजगिरा आदी तृणधान्यांची माहिती या प्रदर्शनात दर्शविण्यात येणार आहे. या प्रदर्शनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य असून सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यत सुरु राहणार आहे.

या प्रदर्शनाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद पुणे यांच्या अंतर्गत असलेल्या विभागाद्वारे शासनाच्या उपक्रमांची माहिती देणारे दालन असतील. अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये आणि सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी. कुमार यांनी केले आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement