पुणे8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
भारतीय सैन्य हे सीमेवर नेहमीच तत्पर असते. सातत्याने कर्तव्यावर असणाऱ्या जवानांना घरातील सन, उत्सव यांपासून नेहमीच दूर राहावे लागते. परंतू त्यांना देखील हे सन उत्सव साजरे करावेसे वाटतात, हाच धागा पकडून वंदेमातरम् संघटना, युवा फिनिक्स सोसायटी व सरहद संस्थेच्या वतीने काश्मीर मधील जावानांची खास भेट घेवून त्यांना दिवाळी फराळाचे वाटप तसेच गणपतीबाप्पाची मूर्ती आणि शंकर महाराज यांची प्रतिकृती भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी वंदे मातरम् संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे, प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ, पुणे शहर विद्यार्थी कार्याध्यक्ष अमोल जगताप, संपर्कप्रमुख प्रसाद कुलकर्णी, तसेच स्थानिक बांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना वंदे मातरम संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन जामगे म्हणाले, बाहेरील शत्रूला नामोहरम करण्यासाठी आपले जवान हे नेहमीच सज्ज असतात. देशात शांतता ही सैन्यदलामुलेच टिकून आहे. सैन्यातील प्रत्येक सैनिक दक्ष असल्याने आपल्याला सन, उत्सव, आनंदाने साजरे करता येतात. म्हणूनच यावर्षी देखील नेहमीप्रमाणे आम्ही सैनिकांना गणेशोत्सवाच्या पूर्वीच दिवाळीचा फराळ घेवून आलो आहोत.
सैनिक हे सीमेवर प्राणांची आहुती देण्यासाठी कायम सज्ज असतात. त्यामुळे त्यांना एक विशेष मान आहे. त्यांच्यामुळेच भारतामध्ये शांती नांदत आहे, अशा वीर जवानांच्या सोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत, हे त्यांना दाखविण्यासाठी आम्ही, या उपक्रमाचे आयोजन केले होते, असे वंदे मातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ यांनी बोलताना सांगितले.
श्रीनगर मध्ये बसणार पुण्यातील बाप्पा
श्रीनगर येथील हरीसिंग रस्त्यावर असणाऱ्या लाल चौकातील मंदिरात दीड दिवसाच्या बाप्पाची स्थापना येथील मराठी बांधवांच्या वतीने करण्यात येते. गेल्या २० वर्षापासून ही परंपरा येथील मराठी बांधवांनी जपली आहे. पुण्यातील गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे. यामुळे यावर्षी पुण्यातील गणपतीबाप्पाची मूर्ती यावेळी भेट देण्यात आली. या मूर्तीची स्थापना मराठी बांधवांच्या वतीने करण्यात येणार आहे.