श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका!: म्हणाले- सरकारला प्रश्न करणाऱ्यांनी आधी अडीच दिवस मंत्रालयात गेलेल्या पप्पांना प्रश्न विचारावा

श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका!: म्हणाले- सरकारला प्रश्न करणाऱ्यांनी आधी अडीच दिवस मंत्रालयात गेलेल्या पप्पांना प्रश्न विचारावा


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Have. Shrikant Shinde’s Bochri Criticism On Aditya Thackeray! Shrikant Shinde Attack On Aditya Thackeray Issue On Marathwada Cabinet Meeting

मुंबई27 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

जे मुख्यमंत्री सत्तेत असताना अडीच वर्षात अडीच दिवस मंत्रालयात गेलेत, अडीच वर्षात सरकारचा कारभार कसा हाकला, हा प्रश्न त्यांनी त्यांच्या पप्पांना विचारला पाहिजे, अशा बोचऱ्या शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. दुष्काळी दौऱ्यावर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.

Advertisement

सव्वा वर्षात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे

कल्याणमध्ये गणेशोत्सवानिमित्ताने कोकणवासियांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मोफत बसेस सोडण्यात आल्या. त्यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदान निशाणा साधला. खा. श्रीकांत शिंदे म्हटले की, संभाजीनगर मध्ये कॅबिनेट झाली या कॅबिनेटमध्ये 60,000 कोटींचे पॅकेज मराठवाड्याला दिलेलं आहे. अनेक प्रलंबित विषयांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेतले आहेत. मागील सव्वा वर्षात शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्यासाठी सगळे नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम केले जात आहे.

Advertisement

आता तरी लोकांना जाऊन भेटा

सरकारकडून फक्त पोस्टरबाजी सुरू असल्याची जे टीका करतात त्यांनी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये स्वतः जाऊन लोकांशी भेटा असेही श्रीकांत शिंदे म्हणाले. आतापर्यंत लोकांना भेटला नाहीत आता तरी भेटा, तेव्हाच दोन सरकारमधील फरक तुम्हाला कळेल, असा टोला खा. शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

Advertisement

मुंबई-गोवा महामार्गासाठी दोन्ही सरकारचे प्रयत्न
मुंबई गोवा मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्याचे कॉन्ट्रॅक्टर बदलण्याचे काम केंद्र सरकारने केलं आणि त्या ठिकाणी एका मार्गिकाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणपती आधी एक मार्गिका सुरू करण्यात येईल असे सांगितले. आपलं सरकार आल्यानंतर केंद्र सरकार व राज्य सरकार दोघांच्या माध्यमातून लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.



Source link

Advertisement