शैक्षणिक: ‘इग्नू’ची प्रवेश प्रक्रिया सुरू, एससी-एसटीला मोफत प्रवेश, कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही


अमरावतीएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) नवी दिल्लीच्या स्थानिक अभ्यास केंद्रांतर्गत जुलै, २०२३ पासून सुरू होणा­ऱ्या सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एससी व एसटी संवर्गातील विद्यार्थ्यांना बीए, बीकॉम व बीएस्सी (सामान्य) विषयासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, असे विद्यापीठाने कळविले आहे.

Advertisement

एम.ए. (इतिहास, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, ग्रामीण विकास, इंग्रजी, हिंदी, तत्वज्ञान), एम.बी.ए. (फायनान्स, ह्रुमन रिसोर्स, मार्केटिंग, ऑपरेशन, सर्वीस मॅनेजमेंट) बी.ए.-बी.कॉम. (सामान्य), बी.ए.(टुरिझम), बी.ए.ऑनर्स (अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, इंग्रजी, हिंदी), बी.कॉम. (लेखा व वित्त), पदव्युत्तर पदविका (आपत्ती व्यवस्थापन, व्यवसाय संघटन, ग्रामीण विकास आणि ह्रुमन रिसोर्स मॅनेजमेंट, फायनान्सीयल मॅनेजमेंट, ऑपरेशन्स मॅनेजमेंट आणि फायनान्सीयल मार्केट्स मॅनेजमेंट), डिप्लोमा (पर्यटन, एचआयव्ही अँड फॅमिली एज्युकेशन), सर्टिफिकेट (आपत्ती व्यवस्थापन, फुड अॅन्ड न्युट्रीशन, ह्रुमन राईट्स, गायडन्स, न्यु्ट्रीशन अॅन्ड चाईल्ड केअर, कंझुमर प्रोटेक्शन, फक्शनल इंग्रजी, ग्रामीण विकास, टिचींग ऑफ इंग्लीश, टुरिझम, एचआयव्ही अँड फॅमिली एज्युकेशन) इत्यादी विषय इग्नूमध्ये उपलब्ध आहे.

इग्नूच्या www.ignou.ac.in वेबसाईटवरून तसेच https://ignouadmission.samarth.edu.in/ या लिंकवरून अर्ज सादर करण्याची अंतिम तिथी दिनांक ३० जून आहे. अनुसुचित जाती व जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना बी.ए. सामान्य, बी.कॉम सामान्य व बी.एस्सी सामान्य अभ्यासक्रमासाठी नि:शुल्क प्रवेश असून अधिक माहितीसाठी इच्छुकांनी इग्नूचे अभ्यासकेंद्र, मुलींचे वसतीगृहाजवळ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिसर येथे सकाळी ८.३० ते १०.३० या वेळात संपर्क साधावा, असे डॉ. वर्षा नाठार, समन्वयक, इग्नू अभ्यासकेंद्र, अमरावती यांनी कळविले आहे.

Advertisement



Source link

Advertisement