शेवटच्या षटकातील चमत्कारा पासून चेन्नई सुपर किंग्स वंचित; ११ धावांनी पंजाब विजयी

शेवटच्या षटकातील चमत्कारा पासून चेन्नई सुपर किंग्स वंचित; ११ धावांनी पंजाव विजयी
शेवटच्या षटकातील चमत्कारा पासून चेन्नई सुपर किंग्स वंचित; ११ धावांनी पंजाव विजयी

अखेरच्या षटकात ऋषी धवनने धोनला बाद केले आणि पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा ११ धावांनी पारभव केला. पंजाबने ठेवलेल्या १८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेला २० षटकात ६ बाद १७६ धावाच करता आल्या. सीएसकेकडून अंबाती रायुडूने ७८ धावांची झुंजार खेळी केली. मात्र त्याला सीएसकेला विजय मिळवून देता आला नाही. पंजाबकडून शिखर धवनने नाबाद ८८ धावांची खेळी केली. त्तयाला सामनावीराचा पुरस्रकार देण्यात आला. ऋषी धवन आणि कसिगो रबाडाने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पंजाब किंग्जने आपल्या संघात तीन बदल केले आहेत. शाहरूख खान, वैभव अरोरा आणि नॅथन अॅलिस यांनी वगळण्यात आले असून त्यांच्या जागी संदीप शर्मा, ऋषी धवन आणि भानुका राजपक्षा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित २० षटकांत ४ विकेट्सच्या नुकसानावर १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला २० षटकांंमध्ये ६ विकेट्स गमावत १७६ धावाच करता आल्या.

पंजाबच्या १८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून अंबाती रायुडूने चिवट झुंज दिली. परंतु त्याची झुंज अपयशी ठरली. ३९ चेंडू खेळताना २००च्या स्ट्राईक रेटने त्याने ७८ धावा केल्या. परंतु त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. ऋतुराज गायकवाड २७ चेंडूत ३० धावांवर बाद झाला. तसेच कर्णधार रविंद्र जडेजाही १६ चेंडूत २१ धावा करू शकला.

Advertisement

या डावात पंजाबच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले. कागिसो रबाडा, रिशी धवन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच संदीप शर्मा आणि अर्शदीप सिंगनेही प्रत्येकी एका विकेटचे योगदान दिले. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजाबकडून सलामीवीर शिखर धवनने चिवट झुंज दिली. हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील २००वा सामना होता. या सामन्यात त्याने ५९ चेंडू खेळताना २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ८८ धावा फटकावल्या. या खेळीसह त्याने आयपीएल मधील ६००० धावा पूर्ण केल्या असून तो सर्वाधिक धावा फटकावणारा विराट कोहलीनंतरचा दुसराच फलंदाज ठरला आहे. धवनव्यतिरिक्त भानुका राजपक्षेने ३२ चेंडूंमध्ये ४२ धावांचे योगदान दिले. या डावादरम्यान चेन्नईकडून ब्रावोने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. ४२ धावा देत त्याने भानुका राजपक्षे आणि लियाम लिविंगस्टोनला बाद केले. तसेच महिश तिक्षिणानेही एक विकेट घेतली.

Advertisement