शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर लखनौ सुपर जायंटने कोलकाता नाईट रायडर्सवर २ धावांनी निसटता विजय मिळवला. शेवटच्या षटकात २१ धावांची गरज असताना रिंकू सिंह आणि सुनिल नारायणने १८ धावांपर्यंत मजल मरली. मात्र सामना २ चेंडूत ३ धावा असा असताना स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर लुईसने रिंकूचा अप्रतिम झेल पकडला आणि सामन्याला कलाटनी मिळाली. रिंकून १५ चेंडूत ४० तर ७ चेंडूत २१ धावा केल्या. त्यापूर्वी श्रेयस अय्यरने ५० तर नितीश राणाने ४२ धावांची खेळी केली. लखनौकडून स्टॉयनिसने ३ तर मोहसीन खानने ३ बळी टिपले. लखनौकडून क्विंटन डिकॉकने १४० धावा केल्या तर कर्णधार राहुलने ६८ धावांची नाबाद खेळी केली. या दोघांनी २१० धावांची नाबाद सलामी दिली.
लखनौ सुपर जांयट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या क्विंटन डिकॉक आणि केएल राहुलने पॉवर प्लेमध्ये सावध सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिसऱ्याच षटकात क्विंटन डिकॉकचा उमेश यादवच्या गोलंदाजीवर त्याचा झेल थर्ड मॅनला उभा असणाऱ्या अभिजीत तोमरकडे गेला मात्र त्याने झेल सोडला. या डावात लखनौकडून मार्कस स्टॉयनिस याने मॅच विनिंग गोलंदाजी केली. त्याने शेवटची २ महत्त्वपूर्ण षटके टाकताना किफायतशीर गोलंदाजी केली. २ षटकांमध्ये २३ धावा देत त्याने अतिशय महत्त्वाच्या ३ विकेट्स काढल्या आणि संघाला शेवटच्या चेंडूवर सामना जिंकून दिला. स्टॉयनिसव्यतिरिक्त मोहसिन खान यानेही अतिशय शानदार गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या.
हे जीवनदान केकेआरला फार महागात पडले. त्यानंतर क्विंटन डिकॉक आणि केएल राहुलने पॉवर प्लेमध्ये लखनौला चाळीशी पार करून दिली. त्यानंतर डिकॉकने मागे वळून पाहिले नाही त्याने धडाकेबाज फलंदाजी करत आपले शतक ५९ चेंडूत पार केले. दुसऱ्या बाजूला केएल राहुल सावध फलंदाजी करत त्याला साथ देत होता. त्याने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी लखनौला नाबाद २१० धावांपर्यंत पोहचवले. क्विंटन डिकॉकने नाबाद १४० धावा केल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
केकेआरच्या पाठोपाठ विकेट पडल्यानंतर ते सामना हरणार असे वाटत होते. मात्र रिंकू सिंह आणि सुनिल नारायणने शेवटच्या चार षटकात तुफान फटकेबाजी केली. त्यांनी शेवटच्या सामन्यात २१ धावांची गरज असताना १८ धावा करत सामना दोन चेंडूत ३ धावा अशी आणली. मात्र पाचव्या चेंडूवर १५ चेंडूत ४० धावा करणारा रिंकू सिंह झेलबाद झाला. स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर लईसने एका हातात झेल घेत सामन्याचे पारडे फिरवले. अखेर स्टॉयनिसने शेवटच्या चेंडूवर उमेश यादवचा त्रिफळा उडवत सामना अवघ्या २ धावांनी जिंकला.