अकोला37 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
मोर्चाच्या तयारीसाठी शिवसेनेकडून बैठका घेतल्या जात आहेत.
जिल्ह्यातील कृषी पंपाना दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा आणि पीक विमा योजनेअंतर्गत तातडीने पुरेसा मोबदला मिळावा यासाठी १६ जोनवारी रोजी शिवसेनेच्या पुढाकाराने काढण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या रूमणे मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
10 हजार शेतकरी येणार
याबाबत रामदास पेठ पोलिसांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांना नोटीस बाजवली आहे. मात्र मोर्चा काढण्यावर शविसेना ठाम आहे. जिल्ह्यातून जवळपास १० हजारांवर शेतकरी महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकणार असल्याचा दावाही शविसेनेकडून करण्यात आला आहे. यासाठी शिवसेनेने बैठकाही घेतल्या आहेत.
नेमकी मागणी काय?
कृषी पंपाला विद्युत पुरवठा करण्याबाबत पूर्व व पश्चिम विदर्भाला वेगवेगळा न्याय देण्यात येत असून हा भेदभाव का? असा सवाल शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी मोर्चाबाबतच्या पत्रकार परिषेदत केला होता. पूर्व विदर्भात कृषी पंपांना दिवसा १२ तास विद्युत पुरवठा होतो. मात्र पश्चिम विदर्भात ८ तास विद्युत पुरवठा होतो. तेही चार दिवस रात्री-संध्याकाळी व तीन दिवस दिवसा पुरवठा होतो. सध्या रात्री थंडी असून, शेतकऱ्यांना साप चावल्याच्याही घटना घडत आहेत. त्यामुळे पूर्व विदर्भाप्रमाणेच पश्चिम विदर्भातही दिवसा पुरेसा विद्युत पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.
काय म्हणतात जिल्हा प्रमुख?
शेतकऱ्यांसाठीच्या रूमणे मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मोर्चा काढण्यातच येणार आहे. वास्तविक आमच्यावर मोर्चा काढण्याची वेळ सरकारमुळेच आली आहे. शिंदे-फडणवीस सरकार पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कोणत्याही कार्यवाहीला आम्ही सामोरे जाऊ., असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी म्हटले आहे.
अशी आहे तयारी
शेतकऱ्यांच्या मोर्चासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. मोर्चासाठी तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये शाखा प्रमुखापासून ते तालुका प्रमुख व काही ठिकाणी उपजिल्हा प्रमुख बैठका घेणार आहेत. शेतकरी हातात रूमणे, ट्रॅक्टर घेऊन सहभागी होणार आहेत. मोर्चाला दुपारी १२ वाजता जि.प. कर्मचारी भवनापासून प्रारंभ होणार आह. मोर्चा रतनलाल प्लाट चाैकातून दुर्गा चाैकातील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकणार आहे.
हे दिले कारण
रामदास पेठ पोलिांनी शविसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांना दिलेल्या नोटीसनुसार सध्या जिल्ह्यात पदवीधर निवडणुकीची आचार संहिता सुरू आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला आहे. त्यामुळे मोर्चाला परवानगी नाकारण्यात येत असल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.