शुन्य सावली दिवस: आपलीच सावली सोडणार आपली साथ; 23 व 25 मे रोजी अमरावतीत नागरिकांना घेता येईल अनुभव


अमरावती11 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सूर्य, पृथ्वीचा मध्य आणि आपले शहर जेव्हा एकाच रेषेत येतात, त्यावेळी सूर्य अगदी आपल्या डो्क्यावरून जातो. यावेळी उन्हात असलेल्या व्यक्तीची किंवा वस्तुची सावली पुढे-मागे न पडता बरोबर त्याच्या पायातच पडते. त्यामुळे काही क्षण सावली गायब होते. या घटनेला खगोल शास्त्रीय भाषेत ‘शून्य सावली-झिरो शॅडो’ असे म्हटले जाते. अमरावती शहरासाठी हा दिवस २३ व २५ मे असेल, असे निरीक्षण मराठी विज्ञान परिषदेच्या स्थानिक शाखेने नोंदवले आहे.

Advertisement

खरे तर सूर्य वर्षभर दुपारी बाराच्या दरम्यान आपल्या डोक्यावर असतो, असे आपण म्हणतो. पण प्रत्यक्षात मात्र असे घडत नाही. ही सावली पायाच्या थोडीशी आजूबाजूला पडते. सूर्य रोज थोडासा उत्तर किंवा दक्षिणेकडे असतो. त्यामुळे हा क्षण आपल्याला रोज अनुभवता येत नाही. मात्र वर्षातील दोनच दिवस असे असतात, ज्यावेळी सूर्य अगदी ९० अंश कोणात डोक्यावर येतो. २१ जूनपर्यंत तो कर्कवृत्तापर्यंत प्रवास करून दक्षिणेकडे परत जातो. पुन्हा २१ जुलैला ही घटना घडते. परंतु, त्यावेळी येथे पावसाळा असतो. त्यामुळे आपल्याला हा अनुभव घेता येत नाही. सूर्याचे २१ डिसेंबरपासून उत्तरायण सुरू होते आणि २१ मार्चला विषुववृत्त पार करून तो कर्कवृत्तात प्रवेश करतो. भारतातील पहिल्या झीरो शॅडो डे ची सुरुवात ९ एप्रिलला कन्याकुमारीपासून होते, असेही परिषदेचे म्हणणे आहे. दरम्यान स्थानिक विद्यार्थी व महिलांनी या शून्य सावलीचा अनुभव घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी केले आहे.

असा करता येईल प्रयोग

Advertisement

या दिवशी आपण आपल्या घरी अथवा शाळेत किंवा सार्वजनिक ठिकाणी डोक्याला टोपी व कानाला रुमाल बांधून कमी वेळात छोटे प्रयोग करून पाहू शकता. पांढरी ड्रॉइंग सीट, प्लास्टिकचे टोपले, पेन्सिल, चौरस त्रिकोणी लाकडी ठोकळे असा एक प्रयोग आहे. नियोजित वेळेच्या आधी जमिनीवर स्टूल ठेवून त्यावर लाकडी फळी ठेवावी. त्यावर पांढरा ड्रॉइंग शीटचा कागद चिटकवावा आणि दिलेल्या वस्तू यावर अंतर राखून ठेवावेत. पेन्सिल उभी करण्याकरिता एखादा खोड रबर वापरून त्यात पेन्सिलची खोचावी. ही पेन्सिल ९० अंशाच्या कोणात उभी राहील असे पहावे. त्यानंतर त्याच्या पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण करावे. तसेच थोड्या थोड्या वेळाने फोटो काढावेत, म्हणजे त्यात होणारा बदल नंतर आपल्याला सहज समजून घेता येईल.Source link

Advertisement