मुंबई18 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
शिवसेनेच्या आमदारांवरील अपात्रतेची सुनावणी येत्या 14 तारखेपासून सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ही सुनावणी घेणार आहेत. या घटनाक्रमामुळे राजकीय पटलावरील हालचालींत मोठी वाढ झाली आहे. आता विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.
या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवण्यात सुरूवात झालीय. शिवसेना शिंदे गटाच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस बजावण्यात आलीय अशी सूत्रांची माहिती आहे. आमदारांना सुनावणीत सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. तसेच अपात्रतेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी युक्तीवादही करावा लागेल. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात याप्रकरणाची सुनावणी होणार आहे.
नेमके प्रकरण काय?
एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र करा, अशी मागणी ठाकरे गटाने याचिकेतून केली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहे
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
काही महिन्यापूर्वी या प्रकरणी मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन असे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले. निर्णय आत्ता सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार असे सूचक वक्तव्य नार्वेकरांनी केले होते. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. महाराष्ट्राच्या या केसच्या सुनावणीदरम्यान अध्यक्षांकडे निर्णय देताना कालमर्यादा असावी की नाही यावरही युक्तीवाद झाले होते. म्हणजे शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनीही हवे तर अध्यक्षांना 2-3 महिन्यांत निर्णय घ्यायला सांगा, पण निर्णय तेच घेतील असे म्हटले होते होते.
सोळा आमदार कोण?
एकनाथ शिंदे- ठाणे
तानाजी सावंत- भूम परंडा
महेश शिंदे- कोरेगाव
चिमणराव पाटील- एरंडोल
संजय रायमूलकर- मेहेकर
बालाजी कल्याणकर- नांदेड उत्तर
रमेश बोरणारे- वैजापूर
प्रकाश सुर्वे- मागाठाणे, मुंबई
बालाजी किणीकर- अंबरनाथ, ठाणे
लता सोनावणे- चोपडा
अनिल बाबर- खानापूर
यामिनी जाधव- भायखळा, मुंबई
संजय शिरसाट- छत्रपती संभाजीनगर पश्चिम
भरत गोगावले- महाड, रायगड
संदीपान भुमरे- पैठण
अब्दुल सत्तार- सिल्लोड