शिवसेनेची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका: पंतप्रधान मोदींसमोर गुडघे टेकले; शिवसेनेचा बाप कोण?, हा प्रश्नच निकाली लागला


33 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. यानिमित्त शिवसेनेचे मुखपत्र सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटावर घणाघाती टीका करण्यात आली आहे.

Advertisement

मंबाजीचे खोके राजकारण

शिवसेनेच्या नावावर उतलेले–मातलेले मंबाजी, त्या मंबाजी मंडळाचे ‘खोके’ राजकारण, त्या राजकारणातून सुरू असलेली महाराष्ट्राची बदनामी, त्या बदनामीतून खचलेल्या मराठी मनास उभारी देण्याचे काम शिवसेनेला करावे लागेल, असे अग्रलेखात म्हटले आहे.

Advertisement

राजकीय चिता पेटेल

मंबाजीने बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगितला, पण मोदींसमोर गुडघे टेकून सांगितले, ‘‘आम्ही शिवसैनिक होतो हे ढोंग होते. त्यामुळे साहेब आम्ही तुमचेच!’’ अशी कबुलीच दिल्याने शिवसेनेचा बाप कोण? हा प्रश्नच निकाली लागला. बाळासाहेबांच्या जन्मदिनी गंगेच्या प्रवाहातील ओंडके आपोआप दूर झाले व काशीच्या हरिश्चंद्र घाटावर पोहोचले. त्या घाटावर हरामखोरांची राजकीय चिता पेटेल हीच बाळासाहेबांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र आदरांजली, अशा शब्दांत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिंदे गटावर आसूड ओढण्यात आले आहेत.

Advertisement

शिवसेनाप्रमुखांची चोरी

अग्रलेखात म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुख आज 97 वर्षांचे झाले असते. 55 वर्षे त्यांनी महाराष्ट्र आणि हिंदुत्वासाठी झिजवली. त्यांनी उभे केलेले, वाढवलेले, रुजवलेले ‘शिवसेना’ नावाचे अग्निकुंड आजही धगधगताना दिसत आहे. आत्मविश्वासाचे बळ असेल तर जगात तुमचा पराभव कोणीच करू शकणार नाही, हा शिवसेनाप्रमुखांचा मंत्र प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात मशालीसारखा पेटता आहे. ही मशाल गेल्या पंचावन्न वर्षांत कुणालाच विझवता आली नाही. सध्या महाराष्ट्रात एक भलतेच राजकारण सुरू झाले आहे. त्यात शिवसेनाप्रमुखांची चोरी करण्याचा विषय प्रामुख्याने आहे, पण या चोरीमारीस देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री वगैरे लोकांनी हातभार लावावा याचे आश्चर्य वाटते.

Advertisement

चोरांचे सरदार सरकारी कवचकुंडलात

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राला ढोंग मान्य नाही. शिवसेनाप्रमुख तर नेहमीच ढोंगबाजांच्या कंबरड्यात लाथा घालीत राहिले. ढोंगबाजांचे मुखवटे त्यांनी जाहीरपणे फाडले, पण गेल्या पाचेक महिन्यांत महाराष्ट्रात ढोंगबाजीने कहर केला आहे. शिवसेनेचे मुखवटे लावून काही मंबाजी सत्तेत घुसले व त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला. पुन्हा या चोरीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी चोरांना पाठबळ व कवच देण्याचे काम देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री करताना दिसत आहेत. अर्थात कुणी मंदिरातील मूर्ती चोरली तरी त्या चोरलेल्या मूर्तीचे मंदिर होऊ शकत नाही, ते श्रद्धास्थान ठरू शकत नाही. चोर मंदिरात घुसतात, चोरी करतात ती मूर्ती चोरून विकण्यासाठीच. महाराष्ट्रात नेमके तेच झाले आहे, पण त्याच चोरांचे सरदार सरकारी कवचकुंडलात वावरतात तेव्हा अधःपतनाची सुरुवात वेगाने होते. देशाचे सर्व प्रमुख स्तंभ व यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत.

Advertisement

शिंदेंना भाजपने दाखवली

अग्रलेखात म्हटले आहे की, एक प्रकारची मनमानी सुरू आहे. देशात अराजक येईल, असा इशारा बाळासाहेबांनी आधीच देऊन ठेवला होता. बाळासाहेबांचे हे भाकीत दुर्दैवाने मोदी-शहा राजवटीत खरे ठरत आहे. मोदी हे पंतप्रधान म्हणून चार दिवसांपूर्वी सर्व लवाजमा घेऊन मुंबईस आले. त्यांनी म्हणे अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण केले. त्यांनी मुंबईच्या विकासासाठी काही घोषणा केल्या. ज्या मोदी सरकारने दोन महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रातून सवादोन लाख कोटींचे उद्योग बाजूच्या गुजरात राज्यात पळवले, त्यांनी मुंबईत येऊन विकासावर भाष्य करावे हे ढोंग नाही तर काय? मोदी यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर फक्त भाजपचाच बोलबाला होता. स्वतःस शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणवून घेणाऱ्यांना मोदींच्या समोरच भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची खरी जागा कशी दाखवली याचे चित्रीकरण समोर आले.

Advertisement

कोल्हा खुर्चीवर बसवला

अग्रलेखात म्हटले आहे की, भाजपने एक पेंढा भरलेला कोल्हा खुर्चीवर बसवला आहे व त्या कोल्हय़ास काडीमात्र किंमत नाही. शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्याने व्यासपीठावर जो अपमान सहन केला, अशांना बाळासाहेबांचे कटआऊट वगैरे लावून ढोंगबाजीचे प्रदर्शन करण्याची गरज नाही. त्यांचे बिंगच उघडे पडले. लाचारी व गुलामीची हद्द पार करीत त्यांनी भाजपच्या व्यासपीठावरूनच जाहीर केले, ‘‘होय, होय, आम्ही मोदींची म्हणजे मोदींची माणसं आहोत?’’ इतके सर्व स्पष्ट झाल्यावर लोकांना कळलेच असेल की, शिवसेना खतम करण्याचे किती मोठे कारस्थान भाजप व त्यांच्या हस्तकांनी रचले होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कबुलीच दिली, ‘‘आमचे नाते मोदींशी!’’ मग बाळासाहेबांचे नाव का घेता व विधानसभेत शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्र अनावरणाचे जे ढोंग रचले गेले आहे ते कशासाठी? एकतर तैलचित्रात निष्ठेच्या तेजाचा अंश नाही व ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेच्या बाबतीत बेइमानी केली, त्याच विधानसभेत तैलचित्र लावून महाराष्ट्रापुढे कोणते चित्र रंगवीत आहात?

Advertisement

विधानसभेत बाळासाहेबांचे तैलचित्र हे ढोंग

अग्रलेखात म्हटले आहे की, विधानसभेत बाळासाहेबांचे तैलचित्र लावणे हे एक ढोंग आहे. त्या तैलचित्रात निष्ठेचा आत्मा व तेज नसल्याने चाळीस बेइमानांच्या ढोंगाशिवाय त्या सोहळय़ात दुसरे काहीच दिसत नाही. मोदींची माणसे म्हणून ज्यांची छाती आज गर्वाने फुगली आहे, त्या फुग्यास टाचणी लावून हवा कमी करण्याचे काम महाराष्ट्राची जनता नक्कीच करणार आहे. शिवसेनाप्रमुखांच्या आजच्या जन्मदिनी एक निर्धार प्रत्येकाने केलाच पाहिजे, तो म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या नावे सुरू झालेला ढोंगाचा बाजार कायमचा गाडण्याचा व संपवण्याचा. शिवसेनेच्या नावावर उतलेले-मातलेले मंबाजी, त्या मंबाजी मंडळाचे ‘खोके’ राजकारण, त्या राजकारणातून सुरू असलेली महाराष्ट्राची बदनामी, त्या बदनामीतून खचलेल्या मराठी मनास उभारी देण्याचे काम शिवसेनेला करावे लागेल. मंबाजीचे मुख्यमंत्रीपद औटघटकेचे आहे व उद्याचे भविष्य शिवसेनेचे आहे. मंबाजीने बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगितला, पण आपला बाप व पाठीराखा दुसराच कोणी असल्याचा दावा त्यांनी परदेशात केला. पुन्हा मोदींसमोर गुडघे टेकून सांगितले, ‘‘आम्ही शिवसैनिक होतो हे ढोंग होते. वाघांच्या झुंडीत शिरलेली आम्ही मेंढरं आणि कोल्हे होतो. आम्ही वाघाचे कातडे पांघरून तेथे होतो, पण ईडी वगैरे लोकांनी आमचे कातडे ओढून काढले. त्यामुळे साहेब आम्ही तुमचेच!’’ अशी कबुलीच दिल्याने शिवसेनेचा बाप कोण? हा प्रश्नच निकाली लागला.

Advertisement

संबंधीत वृत्त

आठवणीतले बाळासाहेब ठाकरे

Advertisement

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा स्नेह त्यांच्याशी जुळत असे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वेळ देत नाही, कार्यकर्त्यांना भेटत नाही त्यांना मदत करत नाही असा आरोप करत अनेक नेते शिंदे सोबत गेले. आज दिवंगत शिवसेनाप्रमुख आणि हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंत्तीनिमित्त जाणून घेऊया 1988 मध्ये का हर्सूल परिसरात रात्री दोन वाजता कशी आणि कुणासाठी झाली होती जाहीर सभा….वाचा सविस्तर

व्यंगचित्रकार ते हिंदुह्रदयसम्राट:वाचा प्रबोधनकारांनी घडवलेल्या अनभिषिक्त सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जीवनगाथा

Advertisement

बाळासाहेब ठाकरे फक्त राजकारणी होते असे नव्हे तर ते एक उत्तम वक्ता, व्यंगचित्रकार, संपादक तसेच कलेची जाण आणि आदर ठेवणारे व्यक्तीमत्व होते. 23 जानेवारी हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस. महाराष्ट्रभर वेगवेगळे सामाजिक उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन करुन बाळासाहेबांना अभिवादन केले जाते. आज थोडक्यात जाणून घेऊया बाळासाहेबांच्या कर्तृत्वाविषयी. वाचा सविस्तर

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement