मुंबई44 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
कल्याण लोकसभा मतदार संघातील सत्ताधारी शिवसेना व भाजपमधील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सुपुत्र तथा कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर भाजपला कमकूतव करण्याचा आरोप केला आहे.
गत काही महिन्यांपासून भाजप – शिवसेनेत कल्याण डोंबिवली महापालिकेतील महापौरपदावरून जुंपली आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. या प्रकरणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सर्वप्रथम भाजपची खिल्ली उडवली. त्यानंतर कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या पाटील यांच्या भूमिकेचे समर्थन करत मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली.
शिंदेंकडून भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे या पितापुत्रांकडून भाजपला कमकूवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले जात आहे. या प्रकरणी शिंदे गटापुढे भाजपचे काहीच चालत नाही, असे गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यांच्या या आरोपांमुळे शिंदे – भाजपत पुन्हा एकदा मतभेद वाढण्याची शक्यता आहे.
शिवसेना-भाजपत यापूर्वीही खटके उडाले
उल्लेखनीय बाब म्हणजे सत्ताधारी भाजप – शिवसेनेत संघर्ष होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी भाजपने मानपाडा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षकांची बदली करण्याची मागणी केली होती. पण ही मागणी फेटाळून करण्यात आली. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यानंतर भाजपने लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदेंना मदत न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे श्रीकांत शिंदेंनी जोरदार रान पेटवले. त्यावर भाजपच्या बड्या नेत्यांना हस्तक्षेप करून हा वाद निस्तरावा लागला.
खालील बातमी वाचा…
मराठा आरक्षणाविषयी अनास्था?:CM शिंदे -बोलून मोकळं व्हायचं, अजितदादा -हो येस, देवेंद्र -माईक चालू आहे; VIDEO व्हायरल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत अनेकदा आपले सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अत्यंत गंभीर असल्याचा पुनरुच्चार केला आहे. पण त्यांच्या एका व्हिडिओमुळे त्यांच्याच दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या व्हिडिओत शिंदे आपण केवळ बोलून मोकळे व्हायचे असे म्हणताना दिसून येत आहेत. त्यांचा यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.
जालन्याच्या आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओ प्रकरणी या तिन्ही नेत्यांना ट्रोल केले जात आहे. या व्हिडिओत शिंदे आपण केवळ बोलून मोकळे व्हायचे, असे म्हणताना दिसून येत आहेत. वाचा संपूर्ण बातमी…