शिवसेना नेत्यांची राजकीय पतंगबाजी: ढील भाजप नेत्यांच्या हाती! चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, किशनचंद तनवाणींची ओढाओढी

शिवसेना नेत्यांची राजकीय पतंगबाजी: ढील भाजप नेत्यांच्या हाती! चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, किशनचंद तनवाणींची ओढाओढीऔरंगाबाद7 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

एकमेकांविरुद्ध चिखलफेक, आरोप – प्रत्यारोप करणाऱ्या औरंगाबादच्या राजकीय नेत्यांमध्ये मकरसंक्रांतीनिमित्त गोडवा दिसला. निमित्त होते भाजप नेत्याने आयोजित केलेल्या या पतंगबाजीच्या कार्यक्रमाचे. यात विविध पक्षांच्या नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली. खासकरुन शिवसेनेच्या नेत्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. चंद्रकांत खैरे, अंबादास दानवेंनी पतंग उडवले त्याला ढिल मात्र, भाजप नेत्यांनी दिली हे विशेषः यादरम्यान उभयंतात हास्यविनोदही झाला.

Advertisement

राजकीय चर्चांना उधाण

औरंगाबादेतही संक्रांतीनिमित्त सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र येत पतंगबाजीचा आनंद लुटला. भाजप नेत्याने आयोजित केलेल्या या पतंगबाजीच्या कार्यक्रमात विविध पक्षांच्या नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली. यामुळे आपसातील वाद विसरुन एकत्र आलेल्या नेत्यांची कृती चर्चेचा विषय ठरला.

Advertisement

भाजप नेत्यातर्फे पतंगबाजीचे आयोजन

औरंगाबादेत शुक्रवारी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून भाजपचे माजी नगरसेवक आणि प्रदेश सदस्य अनिल मकरिये यांनी निवासस्थानी पतंगबाजीचे आयोजन केले. या कार्यक्रमात भाजपचे आमदार अतुल सावे, किशनचंद तनवानी, मनपातील माजी स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, भाजयुमोचे शहराध्यक्ष राजगौरव वानखेडे आदींसह पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि माजी महापौर नंदकुमार घोडेले आदींनी अनिल मकरिये यांच्यासोबत पतंगबाजीचा आनंद लुटला.

Advertisement

पतंग निशाणी मात्र एमआयएमची

शिवसेना आणि भाजपने एकत्र येत पतंगबाजीचा आनंद लुटला. ज्या पतंग चिन्हाच्या एमआयएमने लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. तोच पतंग उंच हवेत उडवत, त्याची दोरी आपल्या हाती असल्याचा जणू संदेश देत होते. तर शिवसेनेच्या पतंगाची चक्री आपल्या हाती पकडत भाजप नेते अनिल मकरियेही वेगळेच संकेत देत होते.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement