शिवसेना कुणाची? शुक्रवारी सुनावणी: ‘मिशन 2024’साठी भाजप सज्ज, 25 राज्यांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा 70 % तुटवडा  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Morning News Brief | Whose Shiv Sena Hearing Held |  BJP Ready For ‘Mission 2024’ | ODI Series  | India New Zealand|

38 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नमस्कार, आज बुधवार 18 जानेवारी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी. पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी.

Advertisement

शिवसेना कुणाची? शुक्रवारी सुनावणी

शिवसेना कुणाची, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये पुढील सुनावणी शुक्रवारी 20 जानेवारीला रोजी होणार आहे. यावेळी ठाकरे यांच्या गटाकडून वकील कपिल सिब्बल यांनी पक्षातंर्गत निवडणुका घेऊ द्या, कोर्टाचा निर्णय येईपर्यंत निकाल देऊ नये अशी विनंती आयोगाला केली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाने यापूर्वी कागदपत्रे सादर केली होती. निकाल आपल्या पदरात पडावा यासाठी दोन्ही गटात प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर करण्याची स्पर्धाच लागली होती. वाचा सविस्तर

Advertisement

पाकिस्तान पंतप्रधानांचे तळ्यात-मळ्यात

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकतेच एक वक्तव्य केले. शरीफ यांनी पाक मधील अल अरेबिया वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक संदेश दिला. ‘आपण काश्मीरसारख्या मुद्द्यांवर एकत्र बसून चर्चा करू शकतो.’ असे म्हटले होते मात्र या नंतरच्या काही तासांतच ‘भारताने काश्मिरात 5 ऑगस्ट 2019 पूर्वीची स्थिती बहाल करावी. कलम 370, 35 ए बहाल करावे लागेल. त्यानंतरच भारतासोबत चर्चा शक्य आहे. असे म्हणत घुमजाव केले आहे. वाचा सविस्तर

Advertisement

मिशन 2024 भाजप सज्ज

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने समारोप झाला. यावेळी त्यांनी पुढील लोकसभा निवडणुकीला फक्त 400 दिवस उरले आहेेत. प्रत्येक कार्यकर्त्याने एकेक मतदाराला भेटण्यासाठी त्याच्या घरापर्यंत जावे असे सांगण्यात आले. भारताचा सर्वोत्तम काळ समोर दिसत असून देशाला तेथे पोहोचवण्यासाठी भाजपला राजकीय चळवळीऐवजी सामाजिक चळवळीच्या रूपात समोर यावे लागले असे देखील त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर

Advertisement

भारत-न्यूझीलंड वनडे मालिका आजपासून

यजमान भारतीय संघाला आता आपल्या घरच्या मैदानावर न्यूझीलंड टीमविरुद्ध वर्चस्व कायम ठेवण्याची संधी आहे. आज बुधवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. भारताने घरच्या मैदानावर एकदाही न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका गमावली नाही. न्यूझीलंड टीम भारत दाैऱ्यावर असताना पाच वर्षांनंतर यजमान संघाविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. आजचा पहिला सामना हैदराबाद येथे होणार आहे. वाचा सविस्तर

Advertisement

राज्यात 88,420 कोटी गुंतवणूक

स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दोन दिवसांत देश-विदेशातील उद्योग समूहांशी महाराष्ट्रात 88,42 कोटींच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. यातून तब्बल 60 हजार लोकांना रोजगार मिळणार आहेत. वाचा सविस्तर

Advertisement

आ. नितीन देशमुख यांची तीन तास चौकशी

बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मंगळवारी दुपारी 12 वाजता अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कार्यालयात हजेरी लावली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांची सव्वातीन तास चौकशी केली. माझ्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा ठपका तक्रारीत असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. या तक्रारींमागे भाजपमधील काही लोकांचा हात आहे. वाहनात डिझेल कुठून भरता हे एसीबी विचारण्याऐवजी गुवाहाटीहून नागपूरला चार्टर विमानाने कसा पोहोचलो हे विचारायला हवे असा टोला देशमुख यांनी लगावला. वाचा सविस्तर

Advertisement

25 राज्यांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा 70 % तुटवडा

देशात तज्ज्ञ डॉक्टरांचा मोठा तुटवडा भासत असल्याचे समोर आले आहे. 34 पैकी 25 राज्य, केंद्रशासित प्रदेश असे आहेत,जिथे सरकारी रुग्णालयांत तज्ज्ञ डॉक्टरांचा 70 % पेक्षा जास्त तुटवडा आहे. या राज्यांत ग्रामीण भागांत सर्जन, महिला, बालरोगसह तज्ज्ञ डॉक्टरांचा मोठा तुटवडा आहे. ग्रामीण आरोग्य सांख्यिकी अहवाल 2021-22 च्या अहवालात हा खुलासा झाला आहे. ग्रामीण आरोग्य सेवा प्रकरणात मध्य प्रदेशची देशात सर्वात वाईट स्थिती असल्याची माहिती देखील समोर आली आहे. वाचा सविस्तर

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement