शिवराजने गाजवला केसरीचा आखाडा: सोलापूरचा युवा आंतरराष्ट्रीय मल्ल महेंद्र गायकवाड ठरला उपमहाराष्ट्र केसरी


पुणेएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदची अॅडहॉक कमिटी व संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कोथरूड (पुणे) येथे आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नांदेडचा शिवराज राक्षे नवा महाराष्ट्र केसरी बनला आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या अंतिम लढतीत शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला पराभूत करत किताब जिंकला. शिवराजने दुहेरी पट काढण्याच्या प्रयत्नात महेंद्रवर पकड घेत त्याला अस्मान दाखवले. मुळ पुण्याचा असलेल्या शिवराजने गादी गटात पहिल्या फेरीत उस्मानाबादच्या धीरज बारस्करला १०-० ने, दुसऱ्या फेरीत साताऱ्याच्या तुषार ठोंबरेला १०-० ने, तिसऱ्या फेरीत औरंगाबादच्या पांडुरंग मोहारेला, उपांत्यपूर्व फेरीत पुण्याच्या हर्षद कोकाटेला, उपांत्य फेरीत हिंगोलीच्या गणेश जगतापवर १०-० अशी मात दिली. आमचे लक्ष्य ऑलिम्पिक आहे : विश्वास होता की आमचे मल्ल महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये पोहोचतील. अपेक्षेप्रमाणे किताब अामच्या आखाड्याला मिळाला. आमचे लक्ष्य ऑलिम्पिक पदक आहे. त्या दृष्टीने खेळाडूंची तयारी सुरू आहे. मेहनतीचे फळ निश्चित मिळते, असे शिवराज व महेंद्रचे प्रशिक्षक गोविंद पवार यांनी सांगितले.

Advertisement

विजेत्यांना महिंद्राची थार गाडी, ट्रॅक्टर, १८ दुचाकींसह लाखाेंची बक्षिसे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहासात प्रथम लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली. महाराष्ट्र केसरी विजेत्यास चांदीची गदा, महिंद्राची थार गाडी आणि बुलडाणा बँकेच्या माध्यमातून पाच लाख रुपये बक्षीस देण्यात आले. उपविजेत्याला ट्रॅक्टर व अडीच लाख रुपये बक्षीस मिळाले. बुलेट गाडी देण्यात आली. त्याचबरोबर वजनी गटातील विजेत्या मल्लांना एकूण १८ दुचाकी गाड्या देण्यात आल्या.

समारोपप्रसंगी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषणसिंग, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री गिरीश महाजन, खा. रामदास तडस, संजयकुमार सिंह, अशोक मोहोळ आणि आयोजक पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ विजेत्याला चांदीची गदा दिली जाते . गदेवर नक्षीकामासाठी २८ गेज चांदीचा पत्रा वापरतात. गदेचे वजन सुमारे ८ ते १० किलो असते. उंची सर्वसाधारण २७ ते ३० इंच असते.

Advertisement

औरंगाबादच्या पांडुरंगला कांस्यपदक महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील गादी गटात औरंगाबादचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पांडुरंग मोहरेने कांस्यपदक आपल्या नावे केले. तिसऱ्या क्रमांकासाठी होणाऱ्या लढतीसाठी हिंगोलीचा गणेश जगताप मैदानावर हजर राहिला नाही. त्यामुळे पांडुरंगला कांस्यपदक देण्यात आले. त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो देवगिरी महाविद्यालयाचा खेळाडू आहे. त्याला खुलताबाद येथील प्रशिक्षक सजनसिंग जारवाल, डॉ. शेखर शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल औरंगाबाद जिल्हा कुस्ती तालीम संघाचे पदाधिकारी डॉ. दत्ता पाथ्रीकर, सचिव प्रा. नारायण शिरसाठ, हरिसिंग राजपूत, पर्वत कासुरे आदींनी अभिनंदन केले आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement